पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडन यांनी निमंत्रीत केलेल्या सर्व जागतिक नेत्यांच्या पर्यावरणीय बदल परिषदेत बोलणार आहेत. या परिषदेसाठी बायडन यांनी मोदींना निमंत्रीत केले होते.
आज जागतिक वसुंधरा दिन आहे. आज आणि उद्या ही परिषद आभासी पद्धतीने होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेच्या पहिल्या सत्रात (भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५.३० ते ७.३०) “अवर कलेक्टिव स्प्रिंट टू २०३०” या बाबत आपले विचार प्रकट करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडू प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
बंगालमध्ये मतदानासाठी पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे आवाहन
आता मध्य प्रदेशातही लसीकरण मोफत
या परिषदेत ४० देशांचे नेते भाग घेणार आहेत. या देशांत मेजर इकॉनॉमिक फोरमचे सदस्य, त्याशिवाय वातावरणीय बदलांना संवेदनशील असलेले देश देखील आहेत. या परिषदेत नेते पर्यावरणाशी निगडीत विविध विषयांवर आपले विचार मांडणार आहेत. यामध्ये वातावरणीय बदल, वातावरणीय बदल रोखण्यासाठी उचलली गेलेली पावले, त्यासाठी आर्थिक सहाय्य, निसर्गाशी निगडीत उपाययोजना आणि स्वच्छ पर्यावरणासाठीचे तंत्रज्ञान याविषयावर बोलणार आहेत.
यावेळेला सर्व वातावरणीय बदलांच्या विरोधातील उपाययोजना आर्थिक विकासाशी निगडीत कशी होतील यावर देखील विचारविनिमय करणार आहेत. त्याचवेळेला देशांच्या विकासाची गरज, अग्रक्रम यांचा देखील विचार केला जाणार आहे.
ही बैठक सर्व माध्यमांवरून प्रसारित केली जाणार आहे. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.