‘जी ७ शिखर परिषदेत सहभागी होऊन पंतप्रधान मोदी मायदेशी परतले’, ‘इटलीचे मानले आभार’!

ट्विटकरत प्रवासातील सांगितला अनुभव

‘जी ७ शिखर परिषदेत सहभागी होऊन पंतप्रधान मोदी मायदेशी परतले’, ‘इटलीचे मानले आभार’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीतील अपुलिया येथे आयोजित ‘जी-७ शिखर परिषदे’त सहभागी झाल्यानंतर शनिवारी(१५ जून) सकाळी मायदेशी परतले. दिल्लीला पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या इटली दौऱ्याची माहिती दिली आणि जी ७ शिखर परिषदेमधील अनुभव सांगितला.तसेच पंतप्रधान मोदींनी ट्विटकरत इटलीच्या लोकांचे आणि सरकारचे आभारही मानले.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करत लिहिले की, अपुलियामध्ये पार पडलेला जी ७ शिखर परिषदेतील दिवस अतिशय फलदायी होता.जागतिक नेत्यांशी संवाद साधला आणि विविध विषयांवर चर्चा केली.”एकत्रितपणे, जागतिक समुदायाला लाभ देणारे प्रभावी उपाय तयार करणे आणि भावी पिढ्यांसाठी एक चांगले जग तयार करणे हे आमचे ध्येय आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.”यासह पंतप्रधान मोदींनी इटलीचे आभार मानले.पंतप्रधान मोदींनी लिहिले की, माझ्या आदरातिथ्याबद्दल मी इटलीच्या लोकांचा आणि सरकारचा आभारी आहे.

पंतप्रधान मोदी गुरुवारी इटलीला रवाना
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळी इटलीला रवाना झाले होते. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अपुलिया येथे गेले. या ठिकाणी शुक्रवारी त्यांनी जी ७ शिखर परिषदेत भाग घेतला आणि जागतिक नेत्यांची भेट घेतली. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चाही केली.

हे ही वाचा..

आगीच्या अफवेवरून ट्रेनमधील प्रवाशांनी मारल्या उड्या, तिघांचा मृत्यू!

केजारीवालांचा न्यायालयातील व्हिडीओ पोस्ट प्रकरणी पत्नी सुनीता यांना नोटीस

छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाने ८ नक्षलवादी टिपले, एक जवान हुतात्मा!

इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचा पंतप्रधान मोदींसोबत खास सेल्फी!

तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिला विदेश दौरा
पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.जी ७ शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की, पोप फ्रान्सिस, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि अनेक देशांच्या प्रमुखांची भेट घेतली आणि त्यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली.यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी जी ७ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी घेताना दिसल्या.यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मन चांसलर स्कोल्झ यांचीही भेट घेतली .

इटलीच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय बैठक
जी ७ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.याबाबत पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर लिहिले की, “पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत खूप चांगली भेट झाली. भारताला जी ७ शिखर परिषदेचा भाग होण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल आणि अद्भूत व्यवस्थांबद्दल त्यांचे आभार.या बैठकीत आम्ही वाणिज्य, ऊर्जा, संरक्षण, दूरसंचार आणि इतर क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा केली. “भारत-इटली संबंध अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.”

Exit mobile version