ऑस्ट्रेलियात मंदिरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या संदर्भात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा केली आहे. सध्या अल्बानीज हे भारतीय दौऱ्यावर असून त्यानिमित्ताने पंतप्रधानांनी हा मुद्दा उपस्थित केला.
हैदराबाद हाऊस येथे या दोन्ही पंतप्रधानांमध्ये दीर्घ चर्चा झाली, त्यात ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर होत असलेल्या हल्ल्यांचा विषय चर्चेला आला. पंतप्रधान मोदी यांनीच पत्रकारांना यासंदर्भात सांगितले.
त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ऑस्ट्रेलियात मंदिरांवर सातत्याने हल्ले होत असून तशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. भारतातील लोक यामुळे चिंतित असून याबाबत अल्बानीज यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यावेळी अल्बानीज यांनी भारतीयांची सुरक्षा याला आमचे प्राधान्य आहे. ऑस्ट्रेलियातील सर्व भारतीयांना आवश्यक ती सुविधा नक्कीच दिली जाईल.
सध्या भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेट सामनेही होत आहेत. अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी आणि अल्बानीज या सामन्याच्या निमित्ताने स्टेडियमवर एकत्र आले.
हे ही वाचा:
पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती ‘सावित्रीबाई फुले’ यांना शतशः नमन
‘वंदे भारत’ला आता मिळणार टाटा स्टीलची मजबुती
मनीष सिसोदियांना हवी सहानुभूती; दारू घोटाळ्यापासून लक्ष हटविण्यासाठी पत्रप्रपंच
लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर १५ ठिकाणी छापे
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज हे राष्ट्रपती भवनातही गेले. तिथे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर त्यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तारीफही त्यांनी केली. अल्बानीज यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशीही संवाद साधला.
ऑस्ट्रेलियासोबत क्लीन हायड्रोजन आणि सोलार क्षेत्रात एकत्र काम करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. दोन्हीकडील सैन्यदलांमध्ये समतोल असेल, संवाद असेल, माहितीची देवाणघेवाण होईल याचाही निर्णय यावेळी घेतला गेला.
युवा सैनिकांमध्ये संपर्क व आदानप्रदान असावे याबाबतही दोन्ही देश आग्रही होते. पंतप्रधान मोदी याबाबत म्हणाले की, सुरक्षेच्या बाबतीत एकमेकांना सहाय्य हा आमच्या धोरणांचा एक भाग आहे. इंडो पॅसिफिक क्षेत्रात आम्ही सहकार्य करणार आहोत. गेल्या काही वर्षात सैन्यदलाच्या बाबतीत दोन्ही देशांनी अनेक करार केलेले आहेत.