. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्यांचे इस्रायलचे समकक्ष बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली. विविध क्षेत्रात द्विपक्षीय धोरणात्मक सहकार्य आणखी मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. सहाव्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल मोदींनी नेतन्याहू यांचे अभिनंदन केले आणि त्यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी नेतान्याहू यांनी सहाव्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
यासोबतच मोदी आणि नेतान्याहू यांच्यातील ही पहिलीच फोनवर चर्चा होती. मोदींनी ट्विट केले, ‘मित्र नेतन्याहू यांच्याशी बोलून आनंद झाला. त्यांच्या प्रभावी निवडणूक विजयाबद्दल आणि विक्रमी सहाव्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. भारत-इस्रायल सामरिक भागीदारी एकत्र पुढे नेण्याची आणखी एक संधी आम्हाला मिळेल याचा आनंद आहे. चर्चेदरम्यान मोदींनी नेतान्याहू यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. दोन्ही नेत्यांनी अलिकडच्या वर्षांत भारत-इस्त्रायल धोरणात्मक भागीदारीमध्ये वेगाने झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. असं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे.
हे ही वाचा:
आरेनंतर आदित्य यांची रेसकोर्ससाठी हाळी?
महाराष्ट्रातही समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करा!
…मग शरद पवार कृषिमंत्री होते की आयपीएलचे कारभारी
म्हाडा टेंडरच्या वादातून कुर्ल्यात गाडीवर केला गोळीबार
भेटीमध्ये विविध क्षेत्रात दोन्ही देशांमधील धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्यावर सहमती दर्शवली. संरक्षण, शेती आणि पाणी यासह अनेक क्षेत्रांमध्ये भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांत घट्ट झाले आहेत.भारत दौऱ्यावर आलेल्या जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे वरिष्ठ अधिकारी कोइची हागिउडा यांनी नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी लोक ते लोक संपर्क वाढवण्याच्या विविध मार्गांवर चर्चा केली आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भारत-जपान संबंधांच्या महत्त्वावर भर दिला.