पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर असून तिथे त्यांनी अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. विशेष म्हणजे नागपूरस्थित महेंद्र शिरसाट या मराठी माणसाची त्यांनी मराठीतच विचारपूस केल्यामुळे त्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
मोदी इटलीच्या रोममध्ये पोहोचले तेव्हा त्यांचे रोमहर्षक स्वागत झाले. तिथे विविध कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. त्यावेळी गर्दीत मिसळलेल्या मोदींना शिरसाट यांनी स्वतःबद्दल सांगितले. माही गुरुजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गुरुजींनी मोदींना आपली ओळख करून दिली.
हा संवाद असा होता-
मोदी : नाव काय तुमचं.
माही गुरुजी: सर, माझं नाव माही. माही गुरुजी म्हणून ओळखतात मला. मी इथे २२ वर्षापासून राहत आहे. सर हे सगळं मी शिकवलं आहे.
मोदी: काय करता तुम्ही?
माही गुरुजी: सर, मी इथे योगा आणि संस्कृत शिकवतो.
मोदी: तुमचे किती शिष्य आहेत?
माही गुरुजी: सर, दोन लाख.
मोदी: दोन लाख… वाह, छान केलंत.
माही गुरुजी: आणि सर माझी एकच अपेक्षा आहे आपल्याकडे.
मोदी: काय आहे?
माही गुरुजी: इथे भारत सरकार आणि इटालीयन सरकारने आयुर्वेदाला परवानगी द्यावी.
मोदी: आयुर्वेद… हो चालेल.
हे ही वाचा:
ऊस ‘पिळून’ वीज बिल काढल्याबद्दल टीकेची झोड
भारताचा हा बॉम्ब का वाढवतोय चीन, पाकिस्तानची चिंता?
अखेर आर्यन खानची दिवाळी मन्नतवर!
इटलीत भारतीय योग आणि अध्यात्माचा प्रचार-प्रसार शिरसाट करतात. मोदींनाही त्यांचे कौतुक वाटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट पुढील आठवड्यात ग्लासगो, स्कॉटलंड येथे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत भेटणार आहेत. बेनेट पंतप्रधान मोदींसह अनेक जागतिक नेत्यांना भेटणार आहेत, असं इस्रायल पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार म्हणाले.