अमेरिका दौऱ्याला निघताना पंतप्रधानांनी चीनला सुनावले

सीमाभागात शांतता नांदली तरच चांगले संबंध

अमेरिका दौऱ्याला निघताना पंतप्रधानांनी चीनला सुनावले

जर चीनसोबतचे संबंध पूर्ववत हवे असतील तर सीमाभागात शांतता नांदणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यासाठी निघण्यापूर्वी व्यक्त केले. गेल्या काही वर्षात भारत आणि चीन यांच्यातील संबंध दुरावले आहेत. विशेषतः सीमाभागात चीनने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भारतानेही त्यांना चोख उत्तर दिले आहे. तेव्हापासून भारत आणि चीन यांच्यातील संबंधांत तणाव निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने नरेंद्र मोदी यांची अमेरिका भेट महत्त्वाची ठरणार आहे.

मोदी म्हणतात की, सार्वभौमत्व आणि सीमाभागातील प्रामाणिक भूमिका यावर आमचा विश्वास आहे. यासंदर्भात जे काही वाद किंवा संघर्ष असती ते चर्चेच्या मार्गाने सोडविण्यावर आमचा भर आहे. मात्र भारताचे सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठा यांचे रक्षण करण्यासाठी भारत पूर्णतः कटीबद्ध आहे. वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी ही बाब स्पष्ट केली.   चीनने या वादग्रस्त भागावर आगळीक करण्याचा वारंवार प्रयत्न केलेला आहे. तिथे बांधकामे उभारण्याचा, अधिक सैन्य उभे करण्याचा प्रयत्न ते करत असतात. भारत चीन सीमेवर २०२०मध्ये सैनिकांमध्ये मोठा संघर्षही झाला होता. त्यावेळी सीमाकरारांचे उल्लंघन केल्याचा आरोपही भारताने चीनवर केलेला आहे. त्यादृष्टीने अमेरिका भेटीत भारताला चीनच्या या मुद्द्याकडे लक्ष वेधता येणार आहे.

पंतप्रधान म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांच्या आमंत्रणावरून मी अमेरिकेला चाललो आहे. दोन लोकशाही राष्ट्रांमधील वृद्धिंगत होत असलेल्या संबंधांचे प्रतिबिंब म्हणून या दौऱ्याकडे पाहता येईल. या तीन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे तीनवेळा जो बायडेन यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चेबद्दल मोदी म्हणाले की, या चर्चेतून दोन देशांतील व्यापार, गुंतवणूकीसंदर्भातील संबंध यावर सखोल विचार करता येणार आहे. त्यासाठी काही प्रमुख सीईओंशी चर्चाही केली जाणार आहे.

हे ही वाचा:

रोहितचा उत्तराधिकारी म्हणून कुणालाही तयार केले नाही!

ओडिशा अपघात प्रकरणी चौकशी सुरू असलेला सिग्नल इंजिनिअर कुटुंबासह बेपत्ता

मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराना आर्थिक रसद?

‘तारक मेहता…’ मालिकेच्या निर्मात्यांविरुद्ध गुन्हा दाखल

ट्विटरचे मालक एलन मस्क यांची भेट

या ऐतिहासिक भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी यूएस काँग्रेसला संबोधित करणे आणि संयुक्त राष्ट्र संघातील जागतिक योग दिन कार्यक्रमास उपस्थित राहणे यासह अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पंतप्रधान मोदी अर्थशास्त्रज्ञ, कलाकार आणि वैज्ञानिकांसह २४ विचारवंत आणि प्रतिष्ठित नागरिकांना भेटणार आहेत. पंतप्रधान मोदींना भेटणाऱ्या प्रमुख लोकांमध्ये ट्विटरचे मालक आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांचाही समावेश आहे. मस्क यांच्यासह खगोलभौतिकशास्त्रज्ञ नील डीग्रास टायसन, ग्रॅमी पुरस्कार विजेते भारतीय-अमेरिकन गायक फालू (फाल्गुनी शाह), पॉल रोमर, निकोलस नसिम तालेब, रे डालियो, जेफ स्मिथ हे असतील. , मायकेल फ्रॉमन डॅनियल रसेल, एल्ब्रिज कोल्बी, डॉ पीटर अग्रे, डॉ स्टीफन क्लास्को, चंद्रिका टंडन इत्यादींचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (२२ जून) अमेरिकेच्या त्यांच्या राज्य दौऱ्यादरम्यान अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी राष्ट्राच्या विधानसभेला संबोधित करतील तेव्हाचा हा त्यांचा १२ वा प्रसंग असेल – आणि ही ऐतिहासिक कामगिरी आजवर इतर कोणत्याही जागतिक नेत्यांना साधता आलेली नाही.   या भेटीच्या महत्त्वाविषयी बोलताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले,  भारत-अमेरिका संबंध बहुआयामी आहेत, विविध क्षेत्रांतील संबंध अधिक दृढ होत आहेत. यूएसए हा भारताचा वस्तू आणि सेवांमध्ये सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. आम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात जवळून सहकार्य करत आहोत.

Exit mobile version