दिल्ली पोलिसांनी पंतप्रधान मोदींविरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या पाकिस्तानी ट्विटर यूजरची खिल्ली उडवली. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ)चे अध्यक्ष इम्रान खान यांना अटक झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. या अनुषंगाने शेजारील देशात ‘अराजकता आणि दहशतवाद’ पसरवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिसर्च अँड ऍनालिसिस विंग (रॉ) विरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी ट्विटर वापरकर्त्याची दिल्ली पोलिसांनी खिल्ली उडवली.
पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांना मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेरून अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ती असल्याचा दावा करणाऱ्या सेहर शिनवारीने ट्विटरवर लिहिले, “दिल्ली पोलिसांची ऑनलाइन लिंक कोणाला माहीत आहे का? माझ्या देशात अराजकता आणि दहशतवाद पसरवल्याबद्दल मला भारतीय पंतप्रधान आणि रॉविरुद्ध तक्रार दाखल करायची आहे.जर भारतीय न्यायालये स्वतंत्र असतील (जसा दावा ते करतात), तर भारताचे सर्वोच्च न्यायालय मला नक्कीच न्याय देईल, ’ असे ट्वीट केले आहे.
हे ही वाचा:
‘गो फर्स्ट’च्या ५५ विमानांकडे एअर इंडिया, इंडिगोचे लक्ष
भारतातील ४२,००० कुशल कामगारांना इस्त्रायलमध्ये नोकरीच्या संधी
आता परदेशातील प्रेक्षकही बघणार ‘द केरला स्टोरी’
पैनगंगा नदीच्या पुलावरून ट्रॅव्हल्स कोसळून भीषण अपघात
मात्र दिल्ली पोलिसांनी या क्षुल्लक ट्वीटलाही त्वरित उत्तर दिले. ‘आम्हाला पाकिस्तानमध्ये कारवाईचे अधिकार नाहीत,’ असे ट्वीटही त्यांनी केले. तर, पाकिस्तानात इंटरनेट बंद असताना हा कार्यकर्ता ट्विट कसा करू शकला, असा सवालही त्यांनी केला. आम्हाला अजूनही पाकिस्तानमध्ये कारवाईचे अधिकार नाहीत. पण, तुमच्या देशात इंटरनेट बंद असताना तुम्ही कसे ट्वीट करत आहात हे जाणून घ्यायला आवडेल!”, अशा शब्दांत दिल्ली पोलिसांनी ट्वीटला उत्तर दिले.