पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार, २२ एप्रिल रोजी पासून दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून नरेंद्र मोदी जेद्दाह येथे पोहोचले आहेत. नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर विशेष लक्ष असतानाचं त्यांच्या सौदी अरेबियातील स्वागताची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सौदी अरेबिया येथे पोहचण्यापूर्वीचं नरेंद्र मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सौदी अरेबियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान एअर इंडिया वन हे सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीमध्ये प्रवेश करताच त्यांच्या विमानाला सौदी अरेबियाच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी एअर स्कॉट देत त्यांचं स्वागत केलं. अशाप्रकारे पंतप्रधान मोदींचे विमान सौदीच्या हवाई हद्दीत पोहोचताच त्यांचे खास स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींचे विमान जेद्दाहला पोहोचवण्यासाठी रॉयल सौदी एअर फोर्सच्या एफ- १५ लढाऊ विमानांनी सुरक्षा पुरवली.
🇮🇳-🇸🇦 friendship flying high!
As a special gesture for the State Visit of PM @narendramodi, his aircraft was escorted by the Royal Saudi Air Force as it entered the Saudi airspace. pic.twitter.com/ad8F9XGmDL
— Randhir Jaiswal (@MEAIndia) April 22, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा सौदी अरेबियाचा तिसरा दौरा आहे, तर ते पहिल्यांदाच जेद्दाला भेट देत आहेत. माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या जेद्दाह भेटीदरम्यान भारत आणि सौदी अरेबिया किमान सहा सामंजस्य करारांवर (एमओयू) स्वाक्षरी करणार आहेत, तर काही अधिक करारांना अंतिम स्वरूप देण्यासाठी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यासमवेत भारत-सौदी अरेबिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिलच्या दुसऱ्या बैठकीचे सहअध्यक्षत्व करतील.
हे ही वाचा :
“प्रसिद्ध कृष्णा: आयपीएलमध्ये चमकते भविष्य!”
पंतप्रधान मत्स्य संपदा योजना ठरली माजी सैनिकाला आधार
मोठ स्वप्न बघण्यासाठी पंतप्रधान मोडी प्रेरणा देतात
गोड, चरबीयुक्त अन्न मेंदूवर परिणाम करते
मंगळवारी सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सौदी अरेबियासोबतच्या आपल्या दीर्घकालीन आणि ऐतिहासिक संबंधांना खूप महत्त्व देतो. अलिकडच्या वर्षांत, दोन्ही देशांमधील संबंधांना धोरणात्मक खोली आणि गती मिळाली आहे. दोन्ही देशांनी संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि लोकांमधील संबंध या क्षेत्रांसह परस्पर फायदेशीर आणि मजबूत भागीदारी विकसित केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी २०१४ पासून आतापर्यंत सौदी अरेबिया आणि आखाती देशांसोबतच्या भारताच्या संबंधांची दिशा बदलली आहे. २०१६ आणि २०१९ मध्ये झालेल्या भेटींनंतर पंतप्रधान मोदींचा आखाती प्रदेशातील देशाचा हा १५ वा दौरा आहे.