पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च सन्मान

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या हस्ते झाला गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च सन्मान

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी रशियातील सर्वात प्रतिष्ठेचा असा ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द ऍपॉस्टल द फर्स्ट कॉल्ड हा नागरी सन्मान देऊन गौरविण्यात आले. नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या हस्ते हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने सध्या नरेंद्र मोदी हे रशियाच्या दौऱ्यावर असून तिथे हेच संबंध वृद्धिंगत करण्यासाठी विविध करार केले जाणार आहेत. हा सन्मान स्वीकारण्यात आल्यानंतर पंतप्रधानांनी व्लादिमिर पुतिन आणि रशियाचे आभार मानले. हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे, असे मोदी म्हणाले. या दोन देशात असलेल्या गेल्या काही शतकातील मित्रत्वाचे प्रतिबिंब या सन्मानातून दिसून येते, असेही मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

तेजस ठाकरे अंबानींच्या कार्यक्रमात नाचले, झाली टीका!

फ्रान्समध्येही टॅक्टिकल वोटींगचा बोलबाला… फ्रेंच खिचडी शिजणार का?

गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक

म्हणे “धर्मनिरपेक्षतेसाठीच अल्पसंख्यांकांना राजकीय आरक्षण !”

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध गेल्या २५ वर्षात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या नेतृत्वाखाली अधिक घट्ट बनले आहेत. भारत आणि रशियाच्या जनतेचे भविष्य अधिक उज्ज्वल होण्यासाठी हे संबंध बळकट होण्याची गरज आहे. रशिया आणि भारताचे संबंध असेच वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न होत राहणे आवश्यक आहे. आम्ही सातत्याने या दृष्टीकोनातून काम करत राहू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Exit mobile version