26 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरदेश दुनियाखलिस्तानी कारवायांकडे पंतप्रधान मोदींनी कॅनडाच्या राष्ट्रप्रमुखांचे लक्ष वेधले

खलिस्तानी कारवायांकडे पंतप्रधान मोदींनी कॅनडाच्या राष्ट्रप्रमुखांचे लक्ष वेधले

कॅनडातील दहशतवादी घटकांद्वारे सुरू असलेल्या भारतविरोधी कारवायांबद्दल तीव्र चिंता

Google News Follow

Related

जी २० शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडात सुरू असलेल्या ‘भारतविरोधी कारवाया’ कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

 

जी २० शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याकडे कॅनडातील दहशतवादी घटकांद्वारे सुरू असलेल्या भारतविरोधी कारवायांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. ‘ते अलिप्ततावादाला प्रोत्साहन देत आहेत, भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांवर हल्ले करत आहेत, राजनैतिक परिसराचे नुकसान करत आहेत आणि कॅनडातील भारतीय समुदायाला आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांना धोका निर्माण करत आहेत,’ असे पंतप्रधानांनी कॅनडाच्या पंतप्रधानांना सांगितल्याचे पंतप्रधान कार्यालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

 

हे ही वाचा:

साताऱ्यात आक्षेपार्ह पोस्टवरून राडा; जाळपोळ, दगडफेकीच्या घटना

G-20 नंतर पाकिस्तानी नागरीक आपल्याच सत्ताधाऱ्यांना देऊ लागले दोष

देवेगौडा येणार भाजपासोबत, लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती

वेंकटेश प्रसादने झुबेरला झापले, पण काँग्रेस प्रवक्त्यांचे पित्त खवळले

‘भारत-कॅनडा संबंध सामायिक लोकशाही मूल्ये, कायद्याच्या राज्याचा आदर आणि एकमेकांच्या नागरिकांमधील मजबूत संबंधांवर आधारित आहेत, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले’, असे या निवेदनात म्हटले आहे. तर, ‘या दहशतवादी शक्तींचा संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थ आणि मानवी तस्करीशी संबंध असणेही कॅनडासाठी चिंतेचा विषय आहे. अशा धोक्यांना सामोरे जाण्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्य करणे अत्यावश्यक आहे,’ असे कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

 

दिल्लीत रविवारी जी २० शिखर परिषदेचा समारोप झाला. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी जी २० अध्यक्ष यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांना ‘खलिस्तानी अतिरेकी’ आणि ‘परकीय हस्तक्षेप’ याबाबत प्रश्न विचारला असता, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी स्पष्टीकरण दिले. ‘कॅनडा हा देश नेहमीच शांततापूर्ण निषेध, अभिव्यक्ती आणि विवेकाच्या स्वातंत्र्याचे समर्थन करत आला आहे. तसेच, हिंसाचार रोखण्याचा आणि द्वेषाचा प्रतिकार करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहील,’ असे सांगतानाच त्यांनी ‘काही समुदायांच्या कृती संपूर्ण समुदायाचे किंवा कॅनडाचे प्रतिनिधित्व करत नाहीत, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच, आम्ही कायद्याचे महत्त्वही जाणतो आणि आम्ही परदेशी हस्तक्षेपाबद्दलही बोललो आहोत,’ असे ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा