पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पराक्रम दिनानिमित्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंदमान आणि निकोबार बेटांच्या २१ सर्वात मोठ्या अनामिक बेटांची नावे २१ परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावर ठेवली आहेत यासोबतच पंतप्रधानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. असून यावेळी पंतप्रधानांनी स्वातंत्र्य वीर सावरकरांचे पण स्मरण केले आहे . ते म्हणाले की, सावरकर आणि देशासाठी लढलेल्या अनेक वीरांना या अंदमानच्या भूमीत तुरुंगवास भोगावा लागला, मात्र त्यांनी देशासाठी आपले शौर्य दाखवून दिले. हे आपल्यासाठी खूप अनमोल आहे. नेताजींचे योगदान दडपण्याचा प्रयत्न पंतप्रधान पुढे म्हणाले की, अंदमानची भूमी ही ती भूमी आहे जिथे पहिल्यांदा तिरंगा फडकवला गेला होता. ते म्हणाले की, भारताचे पहिले स्वतंत्र सरकार अंदमानमध्येच स्थापन झाले. पंतप्रधान म्हणाले की, वीर सावरकर आणि त्यांच्यासारख्या असंख्य वीरांनी अंदमानच्या भूमीवर देशासाठी बलिदान दिले. यासोबत पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यातील नेताजींचे योगदान दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आज संपूर्ण देश त्यांची आठवण करत आहे. नेताजी स्मृतीसाठी कोणावर अवलंबून नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की नेताजींना विसरण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले हे मोठे दुर्दैव आहे, पण जे शूर आहेत त्यांच्या स्मृती कायम स्मरणात राहतील. नेताजींच्या राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचेही अनावरण नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर बांधण्यात येणाऱ्या नेताजींना समर्पित राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचेही पंतप्रधान मोदींनी अनावरण केले. अंदमान आणि निकोबार बेटांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन आणि नेताजींच्या स्मृतीचा आदर करण्यासाठी, पंतप्रधानांनी २०१८ मध्ये बेटाच्या भेटीदरम्यान रॉस बेटांचे नामकरण ‘नेताजी सुभाषचंद्र बोस बेट’ असे केले. नील द्वीप आणि हॅवलॉक बेटाचेही ‘शहीद द्विप’ आणि ‘स्वराज द्वीप’ असे नामकरण करण्यात आले.
सभी 21 परमवीर…सबके लिए एक ही संकल्प था- राष्ट्र सर्वप्रथम! India First! pic.twitter.com/4LarHjMkU1
— PMO India (@PMOIndia) January 23, 2023
हे ही वाचा: पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक आज पराक्रम दिवस आज देशभरात शौर्य दिन साजरा केला जात आहे. २०२१ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारने याची घोषणा केली होती. पंतप्रधान मोदींच्या घोषणेपासून दरवर्षी नेताजींची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी केली जाते. या परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांमध्ये विक्रम बत्रा यांचा समावेश मेजर सोमनाथ शर्मा, सुभेदार आणि मानद कॅप्टन तत्कालीन लान्स नाईक करम सिंग, द्वितीय लेफ्टनंट रामा राघोबा राणे, नाईक जदुनाथ सिंग, कंपनी हवालदार मेजर पिरू सिंग कॅप्टन जीएस सलारिया, लेफ्टनंट कर्नल तत्कालीन लान्स नाईक यांच्यासह २१ परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांच्या नावावरून या बेटांची नावे देण्यात आली आहेत. त्यानंतर मेजर धनसिंग थापा, सुभेदार जोगिंदर सिंग, मेजर शैतान सिंग, अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखों, मेजर सुभेदार रामस्वामी, बाना सिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, सुभेदार मेजर तत्कालीन रायफलमन संजय कुमार आणि सुभेदार मेजर सेवानिवृत्त माननीय कॅप्टन ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव.