लोकप्रियतेत पंतप्रधान मोदी पुन्हा आघाडीवर; राहुल गांधींचा कोणता क्रमांक?

लोकप्रियतेत पंतप्रधान मोदी पुन्हा आघाडीवर; राहुल गांधींचा कोणता क्रमांक?

‘याहू’ने भारतासाठी २०२१ वर्षाचे सर्वेक्षण जाहीर केले आहे. भारतातील लोकांनी यावर्षी इंटरनेटवर सर्वात जास्त काय शोधले हे जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.

लोकप्रियतेच्या बाबतीत इतर नेत्यांचे क्रमांक वर-खाली होत असतात, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले पहिले स्थान कायम राखले आहे. या सर्वेक्षणानुसार पीएम मोदींची लोकप्रियता अबाधित आहे. ते अजूनही इंटरनेट विश्वात सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

पंतप्रधानांनंतर क्रिकेटपटू विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. आश्चर्य म्हणजे ममता बॅनर्जीची लोकप्रियता वाढली आहे. या बाबतीत त्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुढे आहेत. ममता तिसऱ्या स्थानावर तर राहुल गांधी पाचव्या स्थानी घसरले आहेत. तर चौथ्या स्थानावर दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा नंबर लागतो.

राजकारण्यांची लोकप्रियेची श्रेणी पाहता नरेंद्र मोदी यांचे नाव २०२१ मध्ये सर्वाधिक शोधले गेले आहे. ममता बॅनर्जी यांची स्थिती सुधारली असून त्या दुसऱ्या क्रमांकावर आल्या आहेत. राजकारण्यांमध्ये राहुल गांधी तिसऱ्या तर अरविंद केजरीवाल चौथ्या क्रमांकावर आहेत. पाचव्या क्रमांकावर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत.
तसेच व्यावसायिक व्यक्ती म्हणून ऍलन मस्क पहिल्या स्थानावर आहेत. तर मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर आहेत. बिल गेट्स तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर रतन टाटा आणि पाचव्या क्रमांकावर बिग बुल राकेश झुनझुनवाला आहेत.

हे ही वाचा:

वरळी सिलेंडर स्फोट प्रकरण; भाजपाकडून स्थायी समिती सभा तहकुबी

अंतराळातही आता झणझणीत, तिखट खाता येणार! वाचा का ते…

अंजू बॉबी जॉर्जची आणखी एक ऐतिहासिक उडी

नागा संस्कृतीच्या हॉर्नबिल उत्सवाला लोकांनी घेतले डोक्यावर

 

क्रीडा विश्वात विराट कोहली पहिल्या स्थानावर एमएस धोनी दुसऱ्या क्रमांकावर तर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे नीरज चोप्रा तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांच्यानंतर सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांचा क्रमांक लागतो. सर्वाधिक शोधल्या गेलेल्या सेलिब्रिटींमध्ये दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला पहिल्या तर सलमान खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या खालोखाल अल्लू अर्जुन तिसऱ्या आणि पुनीत राजकुमार आणि दिवंगत अभिनेते दिलीप कुमार अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. महिला सेलेब्रेटी मध्ये करीना कपूर पहिल्या स्थानावर त्या पाठोपाठ कतरिना कैफ दुसऱ्या तर प्रियांका चोप्रा तिसऱ्या स्थानावर आहे. यानंतर आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण आहेत.

Exit mobile version