जगभरातील सर्वांत लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अव्वल स्थान प्राप्त केले आहे. ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने जाहीर केलेल्या यादीनुसार, मोदी हे ७६ टक्के अप्रूव्हल रेटिंगसह सर्वांत लोकप्रिय जागतिक नेते ठरले आहेत.
या सर्वेक्षणात दुसऱ्या स्थानी मेक्सिकोचे अध्यक्ष ओब्राडोर आहेत. त्यांना ६६ टक्के रेटिंग मिळाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन ३७ टक्के अप्रूव्हल रेटिंगसह आठव्या स्थानी आहेत. तर, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मैलोनी ४१ टक्के रेटिंगसह सहाव्या स्थानी आहेत.
‘मॉर्निंग कन्सल्ट’ने याच वर्षी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान मोदी यांना जागतिक स्तरावर सर्वांत विश्वासार्ह नेता म्हणून जाहीर केले होते. या सर्वेक्षणात ७६ टक्के नागरिकांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर मोहोर उमटवली होती. आता त्यांनी घेतलेल्या आणखी एका सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी यांना लोकप्रियतेच्या बाबतीत सर्वाधिक ७६ टक्के रेटिंग मिळाली आहे. तर, १८ टक्के जणांनी त्यांच्या विरोधात मतदान केले.
लोकप्रिय नेते
नरेंद्र मोदी (भारत) ७६ टक्के
अँड्रेज मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर (मेक्सिको) ६६ टक्के
ऍलेन बर्सेट (स्वित्झर्लंड) ५८ टक्के
लुइज इनॅसिओ लुला दा सिल्वा (ब्राझील) ४९ टक्के
अँथनी अल्बानीज (ऑस्ट्रेलिया) ४७ टक्के
जॉर्जिया मेलोनी (इटली) ४१ टक्के
अलेक्झांडर डी क्रू (बेल्जियम) ३७ टक्के
जो बायडेन (अमेरिका) ३७ टक्के
पेद्रो सँचेझ (स्पेन) ३७ टक्के
लीओ वराडकर (आयर्लंड) ३६ टक्के
उल्फ कर्स्टर्सन (स्वीडन) ३३ टक्के
मेत्युस्झ मोराविकी (पोलंड) ३१ टक्के