आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी-शी जिनपिंग एकमेकांना भेटले, झाला संवाद

इंडोनेशियातील बाली येथे झाली भेट

आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी-शी जिनपिंग एकमेकांना भेटले, झाला संवाद

भारत आणि चीन यांच्यातील संबंध तणावाचे आहेत मात्र बाली, इंडोनेशिया येथील जी-२० परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष झालेले शी जिनपिंग यांची झालेली भेट सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली.

१५ नोव्हेंबरला बालीतील गरुड विष्णू केंकन कल्चरल पार्कमध्ये ही भेट झाली. तिथे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. नंतर सर्वांनी लज्जतदार जेवणाचा आनंद घेतला. हे जेवण फार मसालेदार नाही ना, अशी विचारणा इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी उपस्थित विविध देशांच्या पाहुण्यांना केली. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथील संगीताचा आणि लेझर शोचा आस्वाद घेत फिरत असताना त्यांची भेट चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झाली. त्यावर अर्थातच सगळ्या जगाच्या नजरा लागून राहिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहून जिनपिंग यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मोदींनीही हात हातात घेऊन त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेते एकमेकांचा हात पकडून बराच काळ संवाद साधत राहिले. जिनपिंग यांची पत्नीही त्यावेळी उपस्थित होती.

गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग एकमेकांना भेटत होते. त्यामुळे याचे आता वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

हे ही वाचा:

चला… महागाईने दिला दिलासा

१५ दिवसांपूर्वीच आफताबचे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले होते

झारखंडच्या माजी डीजीपी म्हणतात, हिंदू मुलींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार होतात!

ठाकरे गटाला धक्का! निवडणूक आयोगाविरोधातील याचिका फेटाळली

 

याआधीही दोघे एका कार्यक्रमात एकत्र होते पण त्यांची भेट झाली नव्हती. सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग समरकंद येथील वार्षिक परिषदेसाठी एकत्र आले होते. पण त्यावेळी त्यांच्यात कोणताही संवाद झाला नव्हता. जून २०२०मध्ये चिनी सेनेने गलवान खोऱ्यात आगळीक केली होती. त्यावेळी भारतीय सैनिक आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. त्यात दोन्ही कडील सैनिक मृत्युमुखी पडले होते. भारताचे २० जवान मृत्युमुखी पडले होते तर चीनचेही अनेक सैनिक मारले गेले पण चीनने ते कधी उघड केले नाही. आतापर्यंत ५ सैनिक मारले गेल्याचे चीनने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version