पंतप्रधान मोदी रशिया, ऑस्ट्रिया दौऱ्यासाठी रवाना; रशियातील भारतीयांशी साधणार संवाद

पुतीन यांच्याकडून पंतप्रधानांसाठी खाजगी डिनरचे आयोजन

पंतप्रधान मोदी रशिया, ऑस्ट्रिया दौऱ्यासाठी रवाना; रशियातील भारतीयांशी साधणार संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार, ८ जुलै रोजी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. तीन दिवसांचा हा दौरा असणार आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात भारत आणि रशिया यांच्यातील २२ व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी नरेंद्र मोदी मॉस्कोमध्ये असतील.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ आणि ९ जुलै रोजी मॉस्कोमध्ये असतील, त्यानंतर ते ऑस्ट्रियाला जातील. यादरम्यान पंतप्रधान मोदी रशियात होणाऱ्या २२ व्या भारत- रशिया वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांदरम्यान अनेक द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे. वार्षिक शिखर परिषदेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना संरक्षण, व्यापार संबंध, गुंतवणूक संबंध, ऊर्जा सहकार्य, शिक्षण, संस्कृती आणि लोकांमधील देवाणघेवाण यासह द्विपक्षीय मुद्द्यांचा आढावा घेता येणार आहे.

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी सोमवारी पंतप्रधानांसाठी खाजगी डिनरचे आयोजन केले आहे. तर, मंगळवारी पंतप्रधान मोदी रशियातील भारतीयांशी संवाद साधणार आहेत. यानंतर रशियाच्या अध्यक्षांचे शासकीय निवासस्थान क्रेमलिनमध्ये एक कार्यक्रम होणार आहे. यानंतर दोन्ही नेत्यांमधील काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

दोन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जुलै रोजी या ऑस्ट्रियाला भेट देणार आहेत. पंतप्रधानांचा हा पहिलाच ऑस्ट्रिया दौरा असणार आहे. ते ऑस्ट्रियाच्या चांसलरशी मर्यादित शिष्टमंडळ- स्तरीय चर्चा करणार आहेत. ऑस्ट्रिया हा एक महत्त्वाचा मध्य युरोपीय देश असून पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, उच्च तंत्रज्ञान क्षेत्र, स्टार्ट-अप क्षेत्रे, मीडिया आणि मनोरंजन या क्षेत्रांमधील मुद्द्यांवरून चर्चा होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

इस्रायलचा गाझातील शाळेवर हवाई हल्ला, १६ जणांचा मृत्यू !

पावसाने मुंबईला झोडपलं; रेल्वेसेवा खोळंबली, रस्ते वाहतूक धीम्या गतीने

‘हाथरसच्या गर्दीत विषारी वायूचे कॅन उघडल्याने लोक गुदमरले’

महुआ मोईत्रांना वक्तव्य भोवणार, एफआयआर दाखल!

“पुढील तीन दिवसांत, रशिया आणि ऑस्ट्रियामध्ये असणार आहे. या भेटी म्हणजे दीर्घकाळ या देशांसोबतचे असलेले संबंध अधिक दृढ करण्याची एक उत्तम संधी असेल. या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्यासाठी उत्सुक आहे,” अशा भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version