पूर्वांचलाच्या विकासाच्या मार्गातील अडथळ्यांना आम्ही लाल कार्ड दाखवले

पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते अनेक विकास प्रकल्पांचे उदघाटन

पूर्वांचलाच्या विकासाच्या मार्गातील अडथळ्यांना आम्ही लाल कार्ड दाखवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी मेघालयची राजधानी शिलाँग येथे दाखल झाले आणि येथील ईशान्य परिषदेच्या ५० व्या वर्धापन दिनाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात सहभागी झाले. पंतप्रधान मोदी पारंपारिक पोशाखात दिसले. यावेळी पंतप्रधान मोदींनी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, फुटबॉलमध्ये खेळाडूने खिलाडूवृत्तीने खेळले नाही तर त्याला लाल कार्ड दाखवून बाहेर पाठवले जाते. त्याचप्रमाणे, गेल्या ८ वर्षांत ईशान्येच्या विकासाच्या मार्गातील अनेक अडथळ्यांना आम्ही लाल कार्ड दाखवले आहे.

केंद्र सरकार आज खेळाबाबत नव्या विचाराने पुढे जात आहे. याचा फायदा ईशान्येतील तरुणांना झाला आहे. देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ ईशान्येला आहे.डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे केवळ संवाद आणि दळणवळण सुधारत नाही तर पर्यटनापासून तंत्रज्ञानापर्यंत, शिक्षणापासून आरोग्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रात सुविधा आणि संधी वाढतात असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

२०१४ पूर्वी येथील योजनांच्या फक्त फिती कापल्या जात होत्या. ईशान्येच्या विकासासाठी सात लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले. मागील सरकारची विचारसरणी विभाजनाची होती. पण आता ही वादांची सीमा नसून तो विकासाचा कॉरिडॉर आहे. आम्ही ईशान्येचा विकास प्रामाणिकपणे करत आहोत. आम्ही विकासाचे मॉडेल तयार करत आहोत. आम्ही ईशान्येतील व्होट बँकेचे राजकारण संपवले आहे असेही पंतप्रधांनी यावेळी स्पष्ट केले.

हे ही वाचा :

‘आगामी निवडणूका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार’

राज्यात आज ग्रामपंचायतींच्या निवडणुका

बाळासाहेबांचे विचार मोडून तोडून टाकणे ही लफंगेगिरीचं

घाटकोपरला रेस्टोरंटच्या तळमजल्यावर आग, १ ठार

त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही उत्तर-पूर्व परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला संबोधित केले. ते म्हणाले की आता एक मंत्री दर १५ दिवसांनी ईशान्येला भेट देतो आणि नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर ५० पेक्षा जास्त वेळा या प्रदेशाला भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी सर्व मोठे प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील याची खात्री केली आहे असे शाह म्हणाले .

Exit mobile version