27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरदेश दुनियापंतप्रधान आमच्याशी आपुलकीने बोलतात, याचे परदेशी खेळाडूंना कौतुक वाटते!

पंतप्रधान आमच्याशी आपुलकीने बोलतात, याचे परदेशी खेळाडूंना कौतुक वाटते!

Google News Follow

Related

पॅरालिम्पिक खेळाडूंनी सांगितले संवादाचे महत्त्व

 

टोकियो, जपान येथे झालेल्या दिव्यांगांच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंशी, पदकविजेत्या खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपुलकीने संवाद साधत सर्वांची मने जिंकलीच पण एक नवा पायंडाही घालून दिला.

बाकीच्या देशात पंतप्रधान आपल्या खेळाडूंशी एवढ्या आत्मियतेने बोलत नाहीत पण आपले पंतप्रधान आपल्याला वैयक्तिकरित्या ओळखतात, आपल्याशी बोलतात, आपल्याला नावाने जाणतात याचे अप्रूप या सगळ्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर दिसत होते.

पंतप्रधानांशी झालेल्या या संवादात प्रत्येक खेळाडू हेच सांगत होता की, आम्ही स्पर्धेला गेलेलो असताना परदेशी खेळाडू आम्हाला विचारत की, तुमचे पंतप्रधान तुमच्याशी एवढे आपुलकीने बोलतात याचे आम्हाला कौतुक वाटते.

या संवादादरम्यान पंतप्रधानांनी विविध खेळाडूंच्या गटांशी चर्चा केली. अथलेटिक्स, नेमबाजी, तिरंदाजी, बॅडमिंटन अशा विविध खेळातील खेळाडूंसोबत बसून त्यांची विचारपूस केली. त्यांच्या कुटुंबियांबद्दल विचारले. या सगळ्या खेळाडूंनी पंतप्रधानांना आपल्या स्वाक्षरी असलेला गमछा प्रदान केला.

बॅडमिंटनपटू पलक कोहली म्हणाली की, तुम्ही आमच्यासोबत आहात हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. प्रारंभी लोक माझ्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहात असत. असे अपंगत्व देव कुणालाही न देवो असे लोक म्हणत पण या अपंगत्वामुळे मी बॅडमिंटन खेळू शकले आणि ऑलिम्पिकलाही जाऊ शकले.

जलतरणपटू सुयश जाधवनेही पंतप्रधानांशी संवाद साधला. या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी नेमबाज अवनी लेखराची प्रशिक्षक सुमा शिरूरनेही पंतप्रधानांशी संवाद साधला. ती म्हणाली की, आतापर्यंत अनेक पॅरालिम्पिक्स झाली पण या स्पर्धेने वेगळा इतिहास घडविला. अशा कामगिरीची आपल्याला खूप आवश्यकता होती.

पंतप्रधान यावेळी म्हणाले की, तुम्हा सर्व खेळाडूंची स्वतःची एक ओळख बनली आहे. आपण सेलिब्रिटी बनले आहात. परिवारांत, गावात, समाजात तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तुमच्या तपस्येमुळे हे शक्य झाले आहे. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमधून देशाची सेवा करू शकता. अनेकांना तुम्ही प्रेरणा देऊ शकता. स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापनदिन आपण साजरा करत आहोत, त्या अनुषंगाने तुम्ही काहीतरी संकल्प करा. या वर्षभरात आपण देशासाठी काय करू शकतो, हे ठरवा. देशवासियांना तुम्ही कसे प्रेरित करणार याचा विचार करा.

खेळाडू म्हणाले की, तुम्ही आमच्याशी वेळोवेळी संवाद साधल्यामुळे आज घराघरात आम्ही पोहोचलो. तुमच्यामुळे आम्हाला एक ओळख मिळाली. दिव्यांग हा शब्दही तुम्ही दिलात. त्यामुळे आम्हाला एक आदर मिळाला.

हे ही वाचा:

आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा….

… निर्दोष असूनही तो ४०० दिवस अडकला इराणमध्ये

आणखीन एका बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला…नराधम अटकेत

सुरक्षिततेची भावना आमच्या बहिणींमध्ये कधीही कमकुवत होऊ नये…

पंतप्रधानांनी या सर्व खेळाडूंसोबत छायाचित्रे घेतली. त्यांची चौकशी केली. त्यांच्यासोबत ऑलिम्पिकमध्ये वापरलेले क्रीडासाहित्य जवळून पाहिले. एकूणच खेळाडूंमध्ये खूप उत्साहाचे वातावरण होते. यापूर्वी, पंतप्रधानांनी इतका वेळ खेळाडूंसोबत घालविल्याचे दिसले नव्हते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे चित्र बदलल्याची भावना खेळाडू व्यक्त करत होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा