पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, २७ जून रोजी अहमदाबाद येथील झेन गार्डनचे उद्घाटन केले. आमदाबाद येथील अहमदाबाद व्यवस्थापन संस्थेत या झेन गार्डनचे उद्घाटन करण्यात आले. तर त्यासोबतच कैझन अकादमीचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हे उद्घाटन केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी जपानमध्ये जे ‘झेन’ आहे तेच भारतात ‘ध्यान’ म्हणून प्रचलित आहे असे प्रतिपादन केले. तर त्यानंतर त्यांनी ध्यानाचे महत्त्व ही समजावून सांगितले.
झेन गार्डन आणि कैझन अकादमीच्या उद्घटनाच्यावेळी बोलताना पंतप्रधानांनी भारत – जपान या दोन्ही देशांच्या सांस्कृतीक संबंधांवर तसेच भागीदारीवरही भाष्य केले. या दोन्ही देशांचे संबंध हे सुलभ आणि आधुनिकतेचे प्रतीक आहे असे पंतप्रधान म्हणाले. भारत आणि जपान या दोन्ही देशांनी जेवढ्या बाह्य प्रगतीवर आणि उत्कर्षावर भर दिला, तितकेच महत्त्व आंतरिक शांती आणि प्रगतीला दिले आहे असे पंतप्रधान म्हणाले. झेन गार्डन हे त्याच शांततेच्या शोधाची आणि साधेपणाची एक सुंदर अभिव्यक्ती असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
हे ही वाचा:
इम्पेरिकल डाटा हा राज्य सरकारचा विषय
मी ओबीसी असल्यामुळे मला महसूल खातं मिळालं नाही
संजय राऊत खातात शिवसेनेचं पण जागतात पवारांच्या निष्ठेला
रेल्वे टीसीने पकडलेला तरुण म्हणतो, जगायचं कसं?
जपानमध्ये जे ‘झेन’ आहे तेच भारतात ‘ध्यान’ आहे असे सांगत पंतप्रधानांनी दोन्ही देशांच्या संस्कृतीमधील समान धाग्याकडे लक्ष वेधून घेतले. भगवान गौतम बुद्धांनी हेच ध्यान आणि बुद्धत्व संसाराला दिले आहे असे मोदींनी सांगितले. तर काईज़ेनची संकल्पना वर्तमानात आमच्या मजबूत उद्दिष्टांना निरंतर पुढे नेण्याच्या आमच्या इच्छाशक्तीचे प्रतीक असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
भारत आणि जपान या दोन्ही देशांमध्ये वर्षानुवर्ष चालत आलेल्या सांस्कृतिक संबंधांचा मजबूत विश्वास आहे तर येणाऱ्या भविष्यासाठी एक कॉमन व्हिजन पण आहे. याच आधारे गेली अनेक वर्ष आम्ही आपल्या स्पेशल स्ट्रॅटेजिक आणि वैश्विक पार्टनरशिपला कायमच मजबूत करत आले आहोत असे मोदींनी सांगीतले.