पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई आणि सिंगापूर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज (३ सप्टेंबर) ब्रुनेईमध्ये दाखल झाले. ब्रुनेई दारुसलामध्ये पंतप्रधान मोदी उतरताच क्राउन प्रिन्स हिज रॉयल हायनेस प्रिन्स हाजी अल-मुहतादी बिल्ला यांनी त्यांचे मोठ्याने स्वागत केले. पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देवून सन्मानित करण्यात आले. ब्रुनेईमध्ये पंतप्रधान मोदी देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाशी चर्चा करतील आणि द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याच्या मार्गांवर चर्चा करतील. ब्रुनेईला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विटरवर लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेईला पोहोचले आणि त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. युवराज हाजी अल-मुताहादी बिल्ला यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. ही भेट विशेष आहे कारण ही भारतीय पंतप्रधानांची पहिली द्विपक्षीय भेट आहे आणि अशा वेळी आली आहे जेव्हा दोन्ही देश या वर्षी राजनैतिक संबंधांच्या स्थापनेची चाळीस वर्षे साजरी करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ब्रुनेईमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ब्रुनेई दारुसलाम येथे उतरलो. विशेषत: व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंधांना चालना देण्यासाठी आपल्या राष्ट्रांमधील मजबूत संबंधांची अपेक्षा करत आहोत. विमानतळावर माझे स्वागत केल्याबद्दल मी क्राउन प्रिन्स हिज रॉयल हायनेस प्रिन्स हाजी अल-मुहतादी बिल्ला यांचे आभार मानतो, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
हे ही वाचा :
छत्तीसगडमध्ये नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा
गांधी घराण्याचा ‘किम जोंग’ अवतार उघड करणारे ‘भोलानाथ’ गेले…
ऊर्जा निर्मिती करारामुळे ७२ हजाराहून अधिक रोजगार निर्मिती
लालबाग अपघात: जोडीदारासोबत खरेदी करायला गेलेल्या नुपुरची स्वप्ने राहिली अधुरी…
ब्रुनेईची राजधानी बंदर सेरी बेगवान येथील एका हॉटेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. यावेळी भारतीय समुदायाने त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी यावेळी सर्वांची भेट घेतली. लहान मुलांनी पंतप्रधान मोदींचे काढलेले चित्र त्यांच्याकडे सादर केले, यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना ऑटोग्राफ दिला. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारतीय उच्चायुक्तालयाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले.
दरम्यान, पंतप्रधान मोदींचा ३ ते ५ सप्टेंबर असा दौरा असणार आहे. ५ सप्टेंबर रोजी ते सिंगापूरला भेट देणार आहेत. या भेटीत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणि सहकार्याच्या नव्या संधींवर चर्चा केली जाणार आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच ब्रुनेई भेट असणार आहे. भारत आणि ब्रुनेई यांच्यातील राजनैतिक संबंध प्रस्थापित होऊन ४० वर्षे झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान मोदींचा ब्रुनेई दौरा होत आहे. यावेळी ब्रुनेईशी संरक्षण, व्यापार आणि गुंतवणूक अशा विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. यासोबतच ऊर्जा, अवकाश, तंत्रज्ञान, आरोग्य, संस्कृती या क्षेत्रांवरही संयुक्त चर्चा होणार आहे.
Landed in Brunei Darussalam. Looking forward to strong ties between our nations, especially in boosting commercial and cultural linkages. I thank Crown Prince His Royal Highness Prince Haji Al-Muhtadee Billah for welcoming me at the airport. pic.twitter.com/azcZywzjCh
— Narendra Modi (@narendramodi) September 3, 2024