25 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरदेश दुनियादहशतवादाच्या आर्थिक मदतीच्या मुळावरच घाव घालणार

दहशतवादाच्या आर्थिक मदतीच्या मुळावरच घाव घालणार

पाकिस्तानला इशारा

Google News Follow

Related

नाही पंतप्रधान मोदी म्हणाले, दहशतवाद संपेपर्यंत आम्ही शांतपणे बसणार नाही. दहशतवादाच्या आर्थिक मदतीच्या मुळावर आपण प्रहार करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘नो मनी फॉर टेरर’ या आंतरराष्ट्रीय मंत्रिस्तरीय परिषदेचे उदघाटन केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ही परिषद भारतात होत आहे ही मोठी गोष्ट आहे. अनेक दशकांपासून दहशतवादाने आपल्या देशाला दुखावण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्याविरुद्ध धैर्याने लढलो, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. बऱ्याच काळापासून दहशतवादाचा गरीब आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. मग ते पर्यटन असो की व्यावसायिक क्षेत्र. दहशतवादी हल्ल्याचा सतत धोका असलेले क्षेत्र कोणालाही आवडत नाही. त्यामुळे लोकांची रोजीरोटी हिरावून घेतली जात आहे. दहशतवादाच्या आर्थिक मदतीच्या मुळावर आपण प्रहार करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे असा स्पष्ट इशारा पंतप्रधानांनी दिला आहे.

दहशतवाद मानवता, स्वातंत्र्य आणि सभ्यतेवर हल्ला

पाकिस्तानला इशारा देताना पंतप्रधान म्हणाले , दहशतवाद हा मानवता, स्वातंत्र्य आणि सभ्यतेवर हल्ला आहे. तो कोणत्याही देशाची सीमा ओळखत नाही. दहशतवादाचा पराभव करायचा असेल तर आपल्याला एकता आणि शून्य सहिष्णुतेचा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल, असे ते म्हणाले.

हे ही वाचा : 

कर्नाटक सरकारचा ‘गो रक्षणा’साठी मोठा निर्णय

मनसे उधळणार राहुल गांधींची शेगावमधील सभा

भारतात येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ

आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रकल्पांना स्थगिती

दहशतवादी हिंसाचार पसरवत आहेत

दिल्लीतील ‘नो मनी फॉर टेरर’ परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही भाषण केले. ते म्हणाले की, दहशतवादी हिंसाचार पसरवत आहेत, तरुणांना कट्टरपंथी बनवत आहेत आणि आर्थिक स्रोतांचे नवीन मार्ग शोधत आहेत. काही देश दहशतवाद्यांचे संरक्षण करतात आणि त्यांना आश्रय देतात. दहशतवाद्याला आश्रय देणे म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. असे घटक आणि असे देश त्यांच्या योजना यशस्वी होऊ नयेत, हे पाहण्याची आपली सामूहिक जबाबदारी आहे.

आठ वर्षांत दहशतवादी कारवायांमध्ये घट

राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक दिनकर गुप्ता यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. ते म्हणाले, गेल्या आठ वर्षांत दहशतवादी कारवायांमध्ये घट झाली आहे. दहशतवादाविरुद्ध केंद्राच्या शून्य सहिष्णुता धोरणाचेही त्यांनी कौतुक केले आणि त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या परिस्थितीत महत्त्वपूर्ण बदल घडून आल्याचे त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा