चीनी कुरापतींवर जपानी चिंता

चीनी कुरापतींवर जपानी चिंता

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेत अनेक महत्वाच्या विषयांना हात घालण्यात आला आहे. यावेळी जपानच्या पंतप्रधानांकडून चीनच्या कुरापतींबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

मंगळवारी भारत आणि जपानच्या पंतप्रधानांनी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत अनेक महत्वपूर्ण विषयांवर उपयुक्त अशी चर्चा केल्याचे नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यात भारत आणि जपानच्या सामरिक आणि वैश्विक भागीदारीतील प्रगती बद्दल चर्चा करण्यात आली. वैश्विक आव्हांनाबद्दलचे समकालिक विचार आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील समन्वय वाढविण्या बाबतही चर्चा झाली.

तर जपानकडून यावेळी पूर्व आणि दक्षिण चीन समुद्रातील परिस्थिती बदलण्यासाठी चालू असलेल्या चीनच्या हालचाली, चीनचा नवा सागरी सुरक्षा कायदा ज्या अंतर्गत चीनने आपल्या रक्षकांना जहाजांवर गोळीबार करण्याचा अधिकार दिला आहे, हॉंगकॉंग मधील परिस्थिती आणि चीनमध्ये उयघर मुस्लिमांवर होणारे अत्याचार या विषयां बद्दल जपान कडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

या चर्चेत भारत आणि जपानच्या पंतप्रधानांनी भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रलिया यांच्या क्वाड समूहातील समन्वय वाढवण्यासंबंधीही चर्चा केली. भारत आणि जपान या दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध मैत्रीचे राहिले असून दोन्ही देश अनेक विषयांत एकत्र कार्यरत आहेत.

हे ही वाचा:

‘न्यूज डंका’ आता ऍपवरही!!

Exit mobile version