भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात २१ जून या योग दिनाच्या दिवशी जगातील १८० देशांच्या प्रतिनिधींसोबत योगासने केली आणि भारताच्या योग परंपरेकडे जगाला आकर्षित केले. मोदी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून त्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पत्नी जिल बायडेन यांनी खास आमंत्रित केले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातील हिरवळीवर ही योगासने सर्व देशांच्या प्रतिनिधींसोबत मोदींनी केली. अवघ्या जगाने हे दृश्य पाहिले. मोदी त्यावेळी म्हणाले की, योग म्हणजे एकजूट. सर्व देशांची एकजूट करण्याची ताकद या योगसाधनेत आहे. योगाला वैश्विकतेचे अधिष्ठान आहे. त्याचे कॉपीराइट नाहीत, पेटंट नाहीत.
हे ही वाचा:
मी ग्रेट आहे कारण मी हिंदू आहे, हे ठासून सांगा!
चीनने जे आज पेरलंय तेच उद्या तिथे उगवेल!
संयुक्त राष्ट्रसंघाने ‘योग’च्या टीकाकारांना फटकारले
विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मोदींशी भेट…भारताच्या उज्ज्वल भवितव्याची दिली ग्वाही
मोदींनी योगासनांच्या आधी छोटे भाषण करून आपली भूमिका मांडली. नमस्ते म्हणत त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले आणि त्यांचे आभार मानले. संयुक्त राष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी या योगाभ्यासात सहभागी झाले होते. पहिला योग दिवस २०१५मध्ये साजरा करण्यात आला होता. त्यानंतर जगभरात सगळीकडे २१ जून हा दिवस योग दिवस म्हणून साजरा केला जातो.
योग ही भारताची फार प्राचीन परंपरा आहे. त्याचा कोणताही कॉपीराइट नाही, कोणतीही रॉयल्टी नाही. योग कोणत्याही वयोमानातील माणसाला करता येण्यासारखी पद्धती आहे. योगकला ही कुठेही नेली जाऊ शकते अगदी वैश्विक आहे. योग म्हणजेच एकजूट. योगाभ्यासामुळे तुमचे अंतर्मन तुम्हाला कळते.