उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान इस्रोबद्दल काय म्हणाले?

सर्वात वजनदार रॉकेटमध्ये ३६ उपग्रह प्रक्षेपित केले

उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान इस्रोबद्दल काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ३६ ब्रॉडबँड उपग्रहांसह सर्वात वजनदार रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अभिनंदन केले. हे आत्मनिर्भरतेचे उदाहरण आहे आणि जागतिक व्यावसायिक बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मकता वाढली असल्याचं पंतप्रधानांनी शुभेच्छा देताना म्हटलं आहे.आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून शनिवारी आणि रविवारी दुपारी १२:०७ वाजता आपल्या सर्वात वजनदार रॉकेटमध्ये ३६ उपग्रह प्रक्षेपित केले.

जागतिक कनेक्टिव्हिटीसाठी ३६ ब्रॉडबँड उपग्रह असलेले आमचे सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन एलव्हीएम ३ चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल एनएसआय एल ,इन-स्पेस, इस्रोचे अभिनंदन. एल्व्हीएम ३ हे आत्मनिर्भरतेचे उदाहरण आहे आणि जागतिक व्यावसायिक लॉन्च सेवा बाजारात भारताच्या स्पर्धात्मकतेची धार यामुळे वाढली आहे असे मोदी यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी

पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

इस्रोची दिवाळी भेट, सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी शनिवारी सकाळी तिरुपती जिल्ह्यातील सुल्लुरपेटा येथील श्री चेंगलम्मा परमेश्वरी देवी मंदिरात जीएसएलव्ही मार्क ३ रॉकेट प्रक्षेपणाच्या यशस्वीतेसाठी विशेष पूजा केली.या मैलाच्या दगडासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना एस सोमनाथ म्हणाले, हे एक ऐतिहासिक मिशन आहे. पंतप्रधान मोदींच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले आहे. पुढील वर्षी जूनमध्ये चांद्रयान-३ मोहीम सुरु होऊ शकते असाही विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

इस्रोचे रॉकेट एलव्हीएम ३ एका खाजगी कम्युनिकेशन फर्म वनवेबचे ३६ उपग्रह घेऊन जाईल. पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एलव्हीएम ३ द्वारे ३६ ब्रॉडबँड उपग्रहांचा आणखी एक संच प्रक्षेपित केला जाईल असे सोमनाथयांनी सांगितले होते. आम्ही आधीच दिवाळी साजरी करणे सुरु केले आहे असे इस्रोचे अध्यक्ष म्हणाले.

Exit mobile version