हे दशक जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे दशक

हे दशक जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे दशक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जम्मू-काश्मीर रोजगार मेळाव्याला हजेरी लावली. जम्मू-काश्मीर रोजगार मेळाव्याला पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज जम्मू-काश्मीरमधील विविध सरकारी विभागांमध्ये काम करण्यासाठी ३,००० तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे दिली जात आहेत. २१ व्या शतकातील हे दशक जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे दशक असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.

जम्मू-काश्मीरमधील तरुण त्यांच्या राज्याच्या विकासासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत ही आनंदाची गोष्ट असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या जनतेने नेहमीच पारदर्शकतेवर भर दिला आहे. आज जे तरुण सरकारी सेवेत रुजू होत आहेत, त्यांना पारदर्शकतेला प्राधान्य द्यावे लागेल.

आपल्या भाषणात पंतप्रधान पुढे म्हणाले की, जम्मू-काश्मीर हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. आपल्याला मिळून जम्मू-काश्मीरला नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला जम्मू-काश्मीरच्या तरुणांच्या पाठिंब्याची गरज आहे. विकासाला नवी गती मिळावी यासाठी युवकांसाठी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. नवीन दृष्टिकोनासह, आपल्याला प्रत्येक पाऊल उचलण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हे ही वाचा:

सेलिब्रेटीला पाहण बेतलं जीवावर, दक्षिण कोरियात चेंगराचेंगरी

गुजरात सरकार ‘ समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत

…. म्हणून मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा वाढवली

यूपीएच्या भोंगळ संरक्षण धोरणाचे दौलत बेग ओल्डी एअर बेसवर दफन

गेल्या ८ वर्षांत सरकारने रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. रोजगार मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात केंद्र सरकार येत्या काही महिन्यांत १० लाखांहून अधिक नियुक्ती पत्रे सुपूर्द करणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

Exit mobile version