रशिया-युक्रेन यांच्यात शांततेसाठी पुढाकार घेण्यास तयार

युक्रेनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मॅक्रॉन यांना ग्वाही

रशिया-युक्रेन यांच्यात शांततेसाठी पुढाकार घेण्यास तयार

‘शांतता प्रस्थापित राखण्यासाठी भारत सदैव तयार आहे,’ अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना दिली. ते युक्रेनसंदर्भात बोलत होते.  दोन देशांमधील संघर्ष आणि करोनासाथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम चिंताजनक आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी सर्व देशांनी हात मिळवणे गरजेचे आहे, याकडे मोदी यांनी लक्ष घेतले.

शिखर परिषदेत मोदी आणि मॅक्रॉन यांनी २०४७पर्यंत द्विपक्षीय संबंधांची दिशा ठरवणाऱ्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केली आणि लढाऊ विमाने आणि पाणबुड्यांवरही सहकार्य सुरू ठेवण्याची घोषणा केली. यावेळी एकूण ६३ सहकार्य करार झाले. परंतु भारतीय नौदलासाठी सागरी राफेल विमानांच्या खरेदीसाठी प्रस्तावित आणि अपेक्षित कराराचा यात उल्लेख नाही. इंडो-पॅसिफिक रोडमॅप अंतर्गत तिसर्‍या देशांचे सहकार्य, अंतराळ सहकार्य, नागरी अणुऊर्जा, दहशतवादविरोधी पाऊल, तंत्रज्ञान आणि नागरी विमान वाहतूक यामधील करारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. तसेच, फ्रान्स सन २०३०पर्यंत ३० हजार भारतीय विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे फ्रान्सतर्फे सांगण्यात आले.

हे ही वाचा:

कॅनडामधील भगवत गीता पार्कमध्ये फुटीरवाद्यांकडून तोडफोड

चांद्रयान-३ च्या यशस्वी भरारीत महाराष्ट्राचा मोलाचा वाटा!

‘मणिपूरमध्ये नाक खुपसू नका ’

धारावी झोपडपट्टीचे रुपडे लवकरच पालटणार!

यावेळी युक्रेन-रशियावरील संघर्षावरही चर्चा झाली. ‘आमचा विश्वास आहे की, अशा सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवल्या पाहिजेत, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. मॅक्रॉन म्हणाले की, भारत आणि फ्रान्सला आंतरराष्ट्रीय समुदायाचे तुकडे होण्याच्या जोखमीबद्दल, विशेषतः युक्रेनमधील रशियाच्या युद्धाच्या संदर्भात समान चिंता आहे. सर्वांत असुरक्षित असणाऱ्या या देशांतील नागरिकांना अन्न सुरक्षा आणि वित्तपुरवठा करून चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्याचे आमचे समान उद्दिष्ट आहे, असेही मॅक्रॉन म्हणाले.

मोदींनी त्यांच्या भाषणात सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा मुद्दाही उपस्थित केला. भारत आणि फ्रान्स या दोघांनीही या धोक्याला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करणे महत्त्वाचे असल्याचे मान्य केले. ‘फ्रान्स आमच्या ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांमध्ये प्रमुख भागीदार आहे. आम्ही आज संरक्षण क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या सह-विकास आणि सह-उत्पादनाबद्दल बोलणार आहोत,’’ असे मोदी म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे, ते असेही म्हणाले की पाणबुड्या असोत की नौदल जहाजे, दोन्ही देश तिसर्‍या मित्र देशांच्या गरजाही पूर्ण करू इच्छितात. आमच्या संरक्षण, अंतराळ संस्थांमध्ये सहकार्य वाढण्याची शक्यता आहे. आम्हाला आमचे संरक्षण सहकार्य आणखी बळकट करायचे आहे, असे मोदी म्हणाले.

Exit mobile version