भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ जागतिक नेत्यांना मागे टाकून ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये अव्वल स्थानावर आहेत . जगातील नेत्यांमध्ये सर्वाधिक चांगले काम करणारे राजकारणी म्हणून पंतप्रधान मोदींना सर्वाधिक पसंतीची मते मिळाली आहेत. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये जगातील ७६ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांनाच सर्वोत्तम राजकारणी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन , कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांसारख्या आघाडीच्या नेत्यांना एका आठवड्यात पसंतीचे राजकारणी म्हणून मागे टाकत अव्वल स्थानावर आले आहेत.
ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगच्या यादीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे ४१ टक्के पसंती मिळवत सहाव्या क्रमांकावर आहेत, तर जस्टिन ट्रूडो ३९टक्क्यांसह सातव्या क्रमांकावर आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक ३४ टक्के मतांसह १० व्या क्रमांकावर आहेत. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांना ३८ टक्के मान्यता मिळाली असून ते या यादीत ८व्या क्रमांकावर आहेत. मॉर्निंग कंसल्ट ने हे सर्वेक्षण केले आहे.
या मानांकनामध्ये १०० टक्के लोकांपैकी ५ टक्के लोकांनी आपले कोणतेही मत व्यक्त केले नाही तर १९ टक्के लोकांनी नापसंती दर्शवली आहे. पण पंतप्रधान मोदींना ७६ टक्के लोकांची पहिली पसंती आहे. त्यांच्यानंतर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज तिसऱ्या क्रमांकावर आहेत. हे मानांकन २२ मार्च ते २८मार्च मार्चच्या शेवटच्या एका आठवड्यापर्यंत आहे.
हे ही वाचा:
हिंसक घटनांमुळे अमित शहांची सभा रद्द; सासारामला होणार होते भाषण
पालघरच्या समुद्रात सापडली बोट, पोलिसांनी केला पाठलाग आणि..
मालेगावचे उबाठा गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यासह ३२ जणांवर गुन्हा
संजय राऊत यांना धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
मॉर्निंग कन्सल्टने जाहीर केलेल्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना तिसरे स्थान मिळाले आहे. अँथनी अल्बानीज यांना जागतिक नेते म्हणून ५५ टक्के मान्यता मिळाली आहे. त्याच वेळी, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी ४९ टक्के पसंतीच्या मतांसह चौथ्या क्रमांकावर आहेत.
मॉर्निंग कन्सल्ट ही अमेरिकन कंपनी असून ती राजकारणी म्हणून कोणत्याही देशात सरकार चालवणाऱ्या नेत्यांच्या सार्वजनिक प्रतिमेची माहिती संकलित करते. नुकतीच जाहीर केलेली ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग्स हे २२ ते २८ मार्च २०२३ या आठवड्यात संकलित केलेल्या माहितीवर आधारित आहेत.