पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून अमेरिकेतील वातावरण सध्या मोदीमय झाल्याचं चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यात ज्या ज्या बड्या लोकांची भेट घेतली त्यांना भारताची आणि नरेंद्र मोदींची भुरळ पडल्याचं त्यांच्या कृतीतून आणि बोलण्यातून जाणवलं. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित केलं. यावेळी त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध, दहशतवाद, अमेरिका आणि मुंबईमधील दहशतवादी हल्ले अशा विविध विषयांवर भाष्य केलं. पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी कमीत कमी १५ वेळा अमेरिकेतील खासदारांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. तर, मोदींच्या एकूण भाषणादरम्यान एकूण ७९ वेळा टाळ्या वाजल्या. पंतप्रधान मोदींचे भाषण संपल्यानंतरही बराच वेळ अमेरिकेतील खासदार उभं राहून टाळ्या वाजवत होते.
जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची ओळख ही ‘ग्लोबल लीडर’ म्हणून होऊ लागली आहे. २०१४ साली सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी भारताची एक नवी ओळख जगासमोर मांडली आहे. दुसऱ्या देशातील संसदेत संबोधन करण्याची संधी पंतप्रधान मोदींना पहिल्यांदा मिळाली नसून यापूर्वीही त्यांनी हा बहुमान घेतला आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशाच्या संसदेत दुसऱ्यांदा संबोधन करणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
हे ही वाचा:
पाटण्यामधील बैठक ही ‘मोदी हटाव’ नव्हे तर ‘परिवार बचाव’ बैठक
‘प्लेन हायजॅक का प्लॅन है’ असा संवाद साधणाऱ्या प्रवाशाला अटक
गेल्या वर्षी मुंबईत मॅनहोलची झाकणे पळवण्याचा विक्रम
मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट करणार, मुंबई पोलिसांना धमकी
२०१४ सालपासूनचा त्यांचा ग्लोबल लीडर म्हणून ओळख बनवण्याचा प्रवास हा अभूतपूर्व असून त्यांनी नऊ वर्षात १२ देशांमध्ये जाऊन तिथल्या संसदेत संबोधन केले आहे.
कसा होता नरेंद्र मोदींचा प्रवास?
साल २०१४
- भूतान संसद
- नेपाळ संसद
- ऑस्ट्रेलिया संसद
- फिजी संसद
साल २०१५
- श्रीलंका संसद
- मंगोलिया संसद
- ब्रिटिश संसद
- अफगाणिस्तान संसद
साल २०१६
- अमेरिका संसद
साल २०१८
- युगांडा संसद
साल २०१९
- मालदीव संसद
साल २०२३
- अमेरिका संसद