पंतप्रधान मोदींनी दिला ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्य’ चा नारा

पंतप्रधान मोदींनी दिला ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्य’ चा नारा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, १२ जून रोजी महत्वाच्या अशा जी-७ समिटमध्ये सहभागी झाले होते. यावेळी जागतिक आरोग्याशी संबंधित एका सत्रात आपले विचार मांडताना मोदींनी ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्य’ असा नारा दिला आहे.

‘बिल्डिंग बॅक स्ट्रॉन्जर-हेल्थ’ असे शीर्षक असलेल्या या सत्रामध्ये कोरोनाचे जगभर सुरु असलेले थैमान, आरोग्य क्षेत्रात जागतिक स्तरावर होणारी सुधारणा आणि भविष्यातील साथीच्या रोगांविरूद्ध गंभीर दृष्टीकोन दृढ करणे या गोष्टींवर भर देण्यात आला. या समिट दरम्यान, पंतप्रधान मोदींनी नुकत्याच भारतात झालेल्या कोविड संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत जी-७ आणि इतर देशांनी दिलेल्या पाठिंब्याचे कौतुक केले. सरकार, उद्योग आणि नागरी समाजातील सर्व स्तरातून या कोविड विरुद्ध लढाईच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने त्यांनी ‘समग्र समाज’ या भारताच्या दृष्टीकोनावर प्रकाश टाकला.

हे ही वाचा:

रशिया विरुद्ध बेल्जियमचा सोपा विजय

डेन्मार्कला नमवत फिनलँडचा ऐतिहासिक विजय

संजय राऊत यांनी हे मान्य केलं की त्यांचा वाघ हा पिंजऱ्यातला आहे

सोनिया मातोश्रींच्या चरणी गेल्यापासून ज्वलंत हिंदुत्व खुंटीला टांगलय

या वेळी पंतप्रधानांनी वैश्विक स्वास्थ्याच्या दृष्टीने जागतिक स्तरावर होत असलेल्या सामूहिक प्रयत्नांना भारताचे समर्थन असल्याचे जाहीर केले. तर कोविड लसीच्या संदर्भात इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या अनुषंगाने ट्रिप्स करारातून मुक्तता देण्यात यावी असा प्रस्ताव विश्व आरोग्य संघटनेकडे भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी दिला आहे. या प्रस्तावाला जी-७ समूहातील देशांनी समर्थन द्यावे अशी मागणी नरेंद्र मोदी यांनी केली.

भविष्यात येणाऱ्या महामारींना रोखण्यासाठी वैश्विक एकता, नेतृत्व आणि एकत्रीकरण गरजेचे असल्याचे मोदींनी नमूद केले. तर यासाठी लोकशाही आणि पारदर्शी समाजव्यवस्थेची विशेष जबाबदारी असल्याचे म्हटले.

Exit mobile version