पंतप्रधानांकडून बायडेन यांना चांदीच्या भारतीय ट्रेनचे मॉडेल भेट!

पंतप्रधान मोदी क्वाड समिटसाठी तीन दिवस अमेरिका दौऱ्यावर

पंतप्रधानांकडून बायडेन यांना चांदीच्या भारतीय ट्रेनचे मॉडेल भेट!

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी अमेरिकेत दाखल होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांची पत्नी जिल बायडेन यांच्याशी भेट घेत त्यांना खास भेटवस्तू दिल्या.

पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ‘चांदीचे भारतीय ट्रेनचे प्राचीन मॉडेल’ भेट म्हणून दिले तर त्यांची पत्नी जिल बायडेन यांना कागदाच्या माचेच्या बॉक्समध्ये पॅक केलेली ‘पश्मिना शाल’ भेट दिली. विशेष म्हणजे भारतीय ट्रेनच्या प्राचीन मॉडेलमध्ये ९२.५ टक्के काम चांदीचे आहे आणि महाराष्ट्राच्या कारागिरांनी आपल्या हाताने हे मॉडेल तयार केले आहे. या ट्रेनच्या मॉडेलवर ‘दिल्ली ते डेलावेअर’ ‘DELHI-DELAWARE’ असे लिहिलेले आहे. हे मॉडेल स्वतःमध्ये खूप खास आहे, जे दिसायलाही खूप आकर्षक आहे. याशिवाय इंजिनच्या बाजूला भारतीय रेल्वे असे लिहिलेले असते.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान अमेरिकेकडून तस्करी झालेल्या २९७ मौल्यवान कलाकृती भारताला परत!

मुुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुका आज रविवारी; मुंबई उच्च न्यायालयाने दिला आदेश

आमदार अतुल भातखळकरांनी दिले लक्ष्मीच्या पंखांना बळ!

पटना NIT मध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वातावरण गढूळ, विद्यार्थ्यांनी पुकारले आंदोलन!

तसेच पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी आणि जो बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन यांना कागदाच्या माचेच्या बॉक्समध्ये पॅक केलेली ‘पश्मिना शाल’ भेट दिली. पश्मिना शाल परंपरेने जम्मू आणि काश्मीरमधून पेपर मॅचे बॉक्समध्ये पॅक करून येतात. कागदाचा लगदा, गोंद आणि अनेक नैसर्गिक साहित्य वापरून हा बॉक्स हाताने बनवला जातो. काश्मीरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करणारी प्रत्येक पेटी  (बॉक्स ) ही एक अनोखी कलाकृती आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी क्वाड समिटसाठी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही झाली, यामध्ये अमेरिका-भारत संबंध वाढवण्याच्या मार्गांवर, प्रादेशिक आणि जागतिक संघर्षांवर चर्चा केली.

Exit mobile version