लस उत्पादनातील निर्बंधांचा विषाणू दूर करा

लस उत्पादनातील निर्बंधांचा विषाणू दूर करा

सिरम इन्स्टिट्युटच्या आदर पूनावाला यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विनंती

भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहे. ही मोहीम सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (एसआयआय)च्या कोविशिल्ड लसीवर आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसींवर अवलंबून आहे. त्यात अमेरिकेने लसीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर निर्बंध घातल्यामुळे सिरमच्या उत्पादनात अडथळा निर्माण झाला होता. हेच निर्बंध दूर करण्याबद्दल आदर पूनावाला यांनी ट्वीट करून बायडेन प्रशासनाला विनंती केली आहे.

हे ही वाचा:

यंदाही ‘आभाळमाया’

नॅशनल हाऊसिंग बँकेच्या बोर्डावर सतीश मराठेंची नियुक्ती

दिल्लीच्या नायाब राज्यपालांकडून हेल्पडेस्कची निर्मीती करण्याचे निर्देश

बीडमध्ये कोरोनाचा हाहाकार, सत्ताधारी मात्र गायब

काही दिवसांपूर्वी आदर पूनावाला यांनी याबाबत ट्वीट केले होते. आज त्यांनी दुसरे ट्वीट करून बायडेन प्रशासनाला हे निर्बंध दूर करण्याची विनंती केली आहे. त्यांनी या ट्वीट मध्ये म्हटले आहे,

“आदरणीय राष्ट्राध्यक्ष, जर आपण खरोखरच या विषाणुला हरवायला एक असू, तर अमेरिकेच्या बाहेरील लस उत्पादक व्यावसायिकांतर्फे मी आपल्याला नम्र विनंती करतो की लस उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर आपण घातलेले निर्बंध उठवावेत, ज्यामुळे लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. आपल्या प्रशासनाकडे याबाबत माहिती उपलब्ध आहे.”

सध्या एसआयआय ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी ऍस्ट्राझेनेका-ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड या लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहे. आत्तापर्यंत भारताने अनेक देशांना ही लस निर्यात देखील केली आहे. या कंपनीने आत्तापर्यंत भारताला लसींचे १० कोटी डोस पुरवले आहेत,  आणि ६ कोटी डोस निर्यात केले आहेत.

Exit mobile version