ब्राझीलच्या विन्हेडो प्रांतात मोठी विमान दुर्घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. ६२ प्रवाशांना घेऊन जाणारं एक विमान कोसळलं असून सर्व प्रवाशांचा यात मृत्यू झाला आहे. शुक्रवार, ९ ऑगस्ट रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) ही दुर्घटना घडली. साओ पाऊलो राज्य अग्निशमन दलाने या वृत्ताची पुष्टी केली आहे. विमान ज्या भागात कोसळलं तिथे अग्निशमन दलाची पथकं आणि बचाव पथकं रवाना करण्यात आली आहेत.
व्होपास लिन्हास एरिआज कंपनीचे एटीआर-७२ हे विमान पराना राज्यातील कास्केवेल शहरातून साओ पाऊलोमधील ग्वारुलहोसला जात होतं. या विमानात एकूण ५८ प्रवासी होते. तसेच पायलटसह चार कर्मचारीदेखील या विमानात होते. दुर्घटनेत विमानातील सर्वांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, एअरलाईन कंपनी व्होपास लिन्हास एरिआज यांनी एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी विमान अपघाताच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. त्यांनी निवेदनात म्हटलं आहे की साओ पाऊलो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ग्वारूलहोसला जाणारं एक विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या विमानात एकूण ५८ प्रवासी होते. तसेच पायलटसह चार कर्मचारीदेखील या विमानात होते. विमान दुर्घटना कशामुळे झाली ते अद्याप स्पष्ट केलेलं नाही.
दुपारी १.३० च्या सुमारास विमानातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यानंतर विमानाचा विमानतळाशी असलेला संपर्क तुटला. काही वेळाने थेट विमान कोसळल्याची माहिती मिळाली. विमान नेमकं कशामुळे कोसळलं, विमानात आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, दक्षिण ब्राझीलमधील एका कार्यक्रमात ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी या विमान अपघाताचं वृत्त सांगत शोक व्यक्त केला. तसेच या कार्यक्रमातून त्यांनी विमान अपघातात दगावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी उपस्थित लोकांना उभे राहून एक मिनिट मौन पाळण्यास सांगितलं.
हे ही वाचा :
ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कुस्तीची परंपरा कायम; अमन सेहरावतने जिंकले कांस्यपदक
अनिल देशमुखांच्या मागे पवार, ठाकरे !
“ऑलिम्पिक अपात्रता प्रकरणात विनेशसोबत कोणताही कट रचलेला नाही”
कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहणार !
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की ज्या ठिकाणी विमान कोसळलं तिथून आगीचे मोठे लोळ दिसत होते. विमान कोसळल्यानंतर एका मोठ्या स्फोटाचा आवाजही आला होता. शिवाय रहिवासी भागाजवळ पेटलेलं विमान कोसळत असल्याचा एक व्हिडीओही आता सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडीओत दिसतंय की जंगल असलेल्या भागात विमान कोसळलं आहे. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट होऊन काळा धूर सर्वत्र पसरला. हवेत असतानाचा हे विमान वेड्यावाकड्या गिरट्या घेत असताना दिसून येत आहे.
A plane with 62 people aboard crashed in a fiery wreck in a residential area of a city in Brazil’s Sao Paulo state Friday, the airline said, but it was not immediately clear how many people were injured or killed, reports The Associated Press
— ANI (@ANI) August 9, 2024