नेपाळमध्ये २२ जणांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता

नेपाळमध्ये २२ जणांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता

नेपाळमध्ये तारा एअरलाईन्सच्या एका विमानाचा संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. २२ जणांना घेऊन जाणाऱ्या या विमानाचा संपर्क तुटला असून सध्या हे विमान बेपत्ता झाले आहे. या विमानात क्रू मेंबर्ससह काही भारतीय, जपानी आणि नेपाळी नागरिक होते. सकाळी ९.५५ वाजता या विमानाने पोखरा येथून उड्डाण केले होते, अशी माहिती विमानतळावरील एका अधिकाऱ्याने दिली आहे.

नेपाळमधील पोखरा येथून तारा एअरलाईन्सच्या तारा एअर 9 NAET ट्वीन इंजिन असलेल्या विमानाने सकाळी ९.५५ वाजता उड्डाण केले होते. या विमानात तीन क्रू मेंबर्स, चार भारतीय नागरिक, तीन जपानी नागरिक आणि नेपाळी नागरिक असे एकूण २२ प्रवासी आहेत. या विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

स्टार्टअप्समध्ये भारताची सेंचुरी; युनिकॉर्नची संख्या १०० वर

अनिल परबांनी मुरुड ग्रामपंचायतीला लिहिलेलं पत्र ईडीच्या हाती

‘रोहित पवारांनी असले धंदे बंद करावेत’

…तर १९४७ची परिस्थिती पुन्हा निर्माण होईल!

नेपाळच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते फदिंद्र मणि पोखरेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयाने बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी दोन खासगी हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. शोधासाठी नेपाळ लष्कराचे हेलिकॉप्टर तैनात करण्याची तयारीही सुरू असल्याचं त्यांनी सांगितले. “विमान मुस्तांग जिल्ह्यातील जोमसोमच्या आकाशात दिसले आणि नंतर धौलागिरी पर्वताच्या दिशेने वळले, त्यानंतर त्याचा संपर्क झाला नाही,” अशी माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version