अफगाणिस्तान मधील तालिबान सरकारने अजब फतवा काढल्याने तालिबानी सरकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तालिबान सरकारने एक नवीन फर्मान काढले आहे. तालिबानने नव्या आदेशानुसार, जिवंत लोक आणि प्राण्यांचे फोटो काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. लष्करातील अधिकाऱ्यांसह सर्वांना आदेश जारी करताना, कंदाहारमधील तालिबान सरकारने म्हटले की, जिवंत लोक आणि प्राण्यांचे फोटो काढणे चुकीचे आहे.
तालिबानने यापूर्वी अनेकदा महिला आणि अल्पसंख्याकांवर निर्बंध लादणारे आदेश दिले आहेत. आता त्यांनी एक अनोखा आदेश जारी केला आहे. तालिबानने नव्या आदेशानुसार, जिवंत लोक आणि प्राण्यांचे फोटो काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. लष्करातील अधिकाऱ्यांसह सर्वांना आदेश जारी करताना, कंदाहारमधील तालिबान सरकारने म्हटले की, जिवंत लोक आणि प्राण्यांचे फोटो काढणे चुकीचे आहे. जर कोणी हे कृत्य करताना आढळल्यास त्याला आळा घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तालिबानने एक पत्रक जारी करून हे फर्मान काढले आहे. तालिबानने जारी केलेल्या आदेश पत्रात म्हटले आहे की, जिवंत लोकांचे फोटो काढल्यास त्यांचे इतर वस्तूंच्या तुलनेत अधिक नुकसान होते. त्यामुळे कोणत्याही औपचारिक किंवा अनौपचारिक परिषद, बैठक किंवा कार्यक्रमात लोकांचे फोटो काढण्यात येऊ नयेत. फोटो काढल्यामुळे निर्जीव वस्तूंपेक्षा जास्त नुकसान होते. हा नियम सरकारी कार्यक्रमांनाही लागू होणार असून कोणत्याही सभेत फोटो काढले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
अखिलेश म्हणाले, जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतरच समाजवादी ‘न्याय यात्रेत’ सहभागी होईल!
६०० गायींची कत्तल, होम डिलिव्हरी, अलवरच्या बीफ मार्केट मधील खुलासा!
कमलनाथ भाजपमध्ये जाणार नाहीत, मात्र नकुलनाथ जाण्याची शक्यता!
टाटा समूहाचे बाजारमूल्य पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त!
हा आदेश जारी करताना तालिबानने इस्लामिक नियमांचे कारण पुढे करत मानव आणि प्राण्यांचे फोटो काढण्यास मनाई असल्याचा तर्क दिला आहे. याबाबत कंदाहारच्या राज्यपालांच्या प्रवक्त्याला विचारले असता, हा आदेश फक्त सरकारी अधिकाऱ्यांनाच लागू होईल, असे सांगण्यात आले आहे. हा निर्णय सामान्य लोक आणि स्वतंत्र माध्यमांसाठी नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, तालिबानचे उच्च अधिकारी स्वत: इतर देशांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीचे फोटो शेअर करत असतात. याआधीही १९९६ ते २००१ दरम्यान अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती. तेव्हा कट्टरपंथी इस्लामिक संघटनेने जिवंत लोकांचे फोटो काढणे आणि व्हिडीओ बनवणे यावर बंदी घातली होती.