पुण्यात सुरू होणार नवा अभ्यासक्रम

पुण्यात सुरू होणार नवा अभ्यासक्रम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेतर्फे बुद्धिस्ट हेरिटेज अँड टुरिजम या विषयाकरिता भारतातील पहिला आणि एकमेव अभ्यासक्र सुरू करण्यात आला आहे. यामागे अजिंठ आणि वेरूळ सारख्या बौद्ध वारसास्थळांची लोकप्रियता वाढवण्याचा विद्यापीठाचा हेतू आहे.

नुकताच या संदर्भात दोन्ही संस्थांच्या उपकुलगुरूंनी एका करारावर स्वाक्षरी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा. नितीन कर्मलकर आणि डेक्कन महाविद्यालयाचे उपकुलगुरू प्रा. प्रसाद जोशी यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

पदव्युत्तर डिप्लोमा असलेल्या या अभ्यासक्रमाचा कालावधी दीड वर्षाचा आहे. या अभ्यासक्रमात बौद्ध परंपरा, इतिहास आणि पर्यटन या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची सुरूवात २०२०-२१ पासून होईल. या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही विषयातील पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.

याबाबत बोलताना प्राध्यापक महेश  देवकर (पाली भाषा विभाग प्रमुख) यांनी दिलेल्या माहितीनुसार या अभ्यासक्रमात ३० विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. याव्यतिरिक्त परदेशी विद्यार्थ्यांना देखील प्रवेश दिला जाईल.

बौद्ध धर्माच्या परंपरा आणि इतिहासाशी निगडीत विविध विषयांना अनुसरून या अभ्यासक्रमात विविध विषय शिकवले जातील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली विभागातील शिक्षक आणि डेक्कन महाविद्यातील काही शिक्षक या अभ्यासक्रमाचे वर्ग घेतील.

पर्यटन हे रोजगार निर्मीतीचे मोठे क्षेत्र असल्याने या अभ्यासक्रमात या विषयाचा देखील समावेश केला आहे. या अभ्यासक्रमादरम्यान पर्यटनाशी निगडीत इंटर्नशिप आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातील.

Exit mobile version