पेरूचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांना डिसेंबर २०१४ मध्ये पदावरून हटवल्यानंतर हे संकट अधिकच गडद होत गेले. कॅस्टिलोचे समर्थक नवीन निवडणुकांच्या मागणीसाठी व्यापक निदर्शने करत आहेत. निदर्शनांदरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचार, उपद्रव आणि प्रचंड गदारोळही झाला. यामध्ये काही लोकांना जीव गमवावा लागल्याचे वृत्त आहे.
देशभरात हिंसक निदर्शनांदरम्यान अत्यंत वाईट परिस्थिती पाहता पेरूचे संरक्षण मंत्री अल्बर्टो ओटारोला यांनी देशात ३० दिवसांच्या आणीबाणीची घोषणा केली. ते म्हणाले की, आंदोलकांनी अनेक ठिकाणी रस्ते अडवले आहेत, अनेक ठिकाणी तोडफोड केली आहे. आणीबाणीमध्ये प्रदर्शनाचे स्वातंत्र्य आणि संमेलनावर निर्बंध समाविष्ट आहेत. यासोबतच विध्वंस आणि हिंसाचार रोखण्यासाठी देशात अनेक ठिकाणी कर्फ्यूही लागू केला जाऊ शकतो. देशातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि सशस्त्र दल देखील तैनात केले जाऊ शकतात पोलिसांबरोबरच सशस्त्र दल देखील सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी तैनात केले जाईल असे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
अमित शहांचा सल्ला, ‘सीमाभागावर दावे नकोत’
धक्कादायक! दहा ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन
श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारची समिती
१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!
पेरूच्या न्यायालयाने माजी अध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांना त्यांच्या सुटकेच्या सुनावणीदरम्यान ४८ तास तुरुंगात राहण्याचा आदेश दिला आहे. पेड्रो कॅस्टिलोचे त्यांची सुटका तसेच देशात पुन्हा निवडणूक व्हावी आणि त्यांचे उत्तराधिकारी माजी उपराष्ट्रपती दिना बोलुअर्टे यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी त्यांचे समर्थक देशभरात रस्त्यावर उतरले आहेत.
पेड्रो कॅस्टिलो यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये पदभार स्वीकारला, त्यांनी विरोधी पक्षांचे वर्चस्व असलेल्या पेरूच्या काँग्रेसचे विसर्जन करण्याची घोषणा केली. यानंतर अनेक मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. घटनात्मक न्यायालयाने कॅस्टिलोच्या निर्णयाचा निषेध केला आणि अमेरिकेने त्यांना निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले. कॅस्टिलोने सर्वांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि काही तासांनंतर विरोधी पक्षांनी तातडीची बैठक बोलावली आणि त्याच्याविरुद्ध महाभियोग आणण्याचा निर्णय घेतला.