30 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरदेश दुनियाचक्रीवादळामुळे किनारपट्टीनजिकची कुटुंबे हलविली सुरक्षित स्थळी

चक्रीवादळामुळे किनारपट्टीनजिकची कुटुंबे हलविली सुरक्षित स्थळी

Google News Follow

Related

तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात कहर उडालेला आहे. कोकण, रायगड, मुंबई अशा सगळ्या किनारपट्टीलगतच्या भागांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या किनारपट्टीलगतच्या भागातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील जवळपास १२ हजार लोकांना सोमवारी सकाळपर्यंत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. चक्रीवादळाचा तडाखा लक्षात घेऊन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानांची ये-जाही थांबविण्यात आली आहे. रात्री ८ वाजेपर्यंत विमानांच्या आगमन-निर्गमनावर बंदी कायम असेल.

हे ही वाचा:
तौक्ते वादळ: रायगडमध्ये दोन महिलांचा मृत्यू

अरबी समुद्रात वादळे जागतिक तापमानावाढीमुळे?

उद्धव ठाकरे वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार?- भाजपा

ठाकरे सरकार आणि व्हेंटिलेटर गफला

तौक्ते हे चक्रीवादळ आता महाराष्ट्रातील किनारपट्टीवरून गुजरातकडे सरकणार आहे. ताशी १७ किमी वेगाने मार्गक्रमण करणारे हे वादळ या दरम्यान मुंबई, रायगड, कोकण या भागात मोठी हानी करणार आहे. त्यामुळे सगळीकडे दक्षता बाळगण्यात येत आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागानुसार रत्नागिरी जिल्ह्यातून ३८९६, सिंधुदुर्गातून १४४ आणि रायगड जिल्ह्यातून ८३८० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तेथे चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसू शकेल, असा इशारा त्यातून मिळतो आहे. या जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वप्रकारचा बंदोबस्त करण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबरोबरच त्यांच्या पुनर्वसनासाठीही पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

चक्रीवादळाचे रौद्र रूप लक्षात घेऊन विमानांची ये-जा बंद करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने प्रसारमाध्यमांना सांगितले की, १७ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत विमानतळामधील हवाई नियंत्रण कक्ष बंद राहणार आहे. अजूनही चक्रीवादळाचा धोका कायम असल्यामुळे यानंतरही विमानांची ये-जा बंदच राहण्याची शक्यता आहे. वांद्रे-वरळी सी लिंकही या वादळामुळे बंद ठेवण्यात आला असून तिथून कोणतीही वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहणार नाही, असे सांगण्यात आले आहे. चक्रीवादळाची गती आणि येणारे संभाव्य संकट लक्षात घेता लसीकरणही बंद ठेवण्यात आले आहे. आता मंगळवारी हे लसीकरण होईल, अशी अपेक्षा आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा