उत्तराखंड दुर्घटना: आप्तेष्टांच्या आशा मावळल्या

उत्तराखंड दुर्घटना: आप्तेष्टांच्या आशा मावळल्या

उत्तराखंडच्या दुर्घटनेत तपोवन धरणाच्या जवळच्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या आप्तेष्टांच्या आशा मावळल्या आहेत. बचावकर्मी आठवड्याभराच्या अथक प्रयत्नांनतर १.६ कि.मी लांबीच्या बोगद्यात १२५ मीटर आत शिरण्यात यशस्वी झाले. परंतु त्यानंतर त्यांची भिती खरी ठरली.

हे ही वाचा:

उत्तराखंडमधील बचावकार्य अजूनही सुरूच

उत्तराखंड दुर्घटनेत बोगद्यात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

बोगद्यात प्रवेश केल्यानंतर त्यांना सुरूवातीलाच ढिगाऱ्याखाली काही मृतदेह सापडले. रविवारी पहाटे ५ वाजता काही मृतदेहांना बाहेर काढण्यात त्यांना यश आले. मात्र त्यामुळे वातावरणात दुखी झाले होते. अनेक आप्तेष्टांच्या मनात पुढील मृतदेह आपल्याच माणसाचा तर नसेल ना? ही भीती दाटली होती.

एका कामगाराच्या आप्तेष्टाने सांगितले की आम्हाला जेव्हा अधिकाऱ्यांनी एका मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावले तेव्हा माझी आशा मावळली, दुर्दैवाने तो मृतदेह माझ्या भावाचा निघाला. त्याला लहान मुली आहेत, त्यापैकी एक केवळ आठ महिन्यांची आहे. आता मी त्याच्या परिवाराला काय सांगू? जवळपास अशीच दुःखद व्यथा आणखी एका कामगाराच्या नातेवाईकांची आहे.

बचावकर्मींनी अपघातस्थळी तात्पुरत्या शवागाराची उभारणी केली आहे. त्याठिकाणी मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम केले जात आहे. तिथल्य पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही अनेक नातेवाईकांचे उदास चेहरे, रविवारपासून पाहत आहोत. त्यांना त्यांची प्रिय माणसे जीवंत सापडतील अशी आशा होती. त्यांचे मृतदेह पाहून, नातेवाईकांच्या आशा मावळून जातात, ज्या आम्हालाही जाणवतात.

Exit mobile version