अफगाणिस्तानातून पळताना विमानातून पडून लोकांचा मृत्यु

अफगाणिस्तानातून पळताना विमानातून पडून लोकांचा मृत्यु

अफगाणिस्तानची राजधानी काबुल तालिबान्यांच्या हाती पडल्यानंतर, आता त्या ठिकाणी अराजकिय अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सामान्य नागरीक अफगाणिस्तानातून पळ काढत आहेत. यामध्ये काही लोकांचा जीव देखील गेला आहे.

अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवर तालिबानी उभे असल्याने सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी सध्या फक्त हवाई मार्ग सुरक्षित आहे. अमेरिका, भारतासह विविध देश सध्या सैनिकी अभियान राबवून तेथील आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढत आहे. त्यामुळे जीवाचा धोका पत्करून काही लोकांनी विमानाच्या लँडिंग गिअरवर बसून निघून जाण्याचा प्रयत्न केला आहे.

हे ही वाचा:

भारताने अफगाणिस्तानातून परत आणले १२९ नागरिक

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे तिसरे पुण्यस्मरण

हुश्श…पुजारा, रहाणेला सूर गवसला

पवनदीप झाला इंडियन आयडल

पत्रकार आदित्य राज कौल यांनी त्यांच्या ट्वीटरवरून अफगाणिस्तानातून पळून जाणाऱ्या लोकांचे व्हिडिओ टाकले आहेत. विमानाच्या लँडिंग गिअरवर बसून निघून जाण्याचा प्रयत्न करणारे लोक दिसत आहेत. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एका विमानाने उड्डाण केल्यानंतर त्यामधून काही लोक खाली पडताना देखील दिसत आहेत. तिसऱ्या व्हिडिओमध्ये उड्डाणासाठी जाणाऱ्या विमानाच्या आजूबाजूला कित्येक लोक धावत असून ते विमानाच्या लँडिंग गिअरवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

या व्हिडिओमधून अफगाणिस्तानात चिघळत चाललेल्या परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. काल तालिबानने काबुल काबीज केलं. यावेळी तालिबानला एकही गोळी झाडावी लागली नव्हती. तालिबानने काबुलवर कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गानी हे ओमानला पळून गेले आहेत. त्यामुळे आता अफगाणिस्तानवर तालिबान राजवटीचा धोका निर्माण झाला आहे.

Exit mobile version