पाकिस्तानात पीठासाठी हाणामारी, पीठाच्या किमती गगनाला भिडल्या

आर्थिक अवस्था बिकट, पाकिस्तान दिवाळखोरीकडे

पाकिस्तानात पीठासाठी हाणामारी, पीठाच्या किमती गगनाला भिडल्या

पाकिस्तानची अवस्था दिवसेंदिवस वाईटाहून वाईटाकडे जात चालली आहे. विविध वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेतच पण आता पीठासाठीही लोक एकमेकांच्या अंगावर धावून जाताना दिसत आहेत.

सरकारच्या माध्यमातून लोकांना पीठाचे वाटप होत आहे, पण ते घेण्यासाठी लोकांमध्ये हाणामारी होताना दिसते आहे. सवलतीच्या दरात हे पीठ उपलब्ध केले जात आहे. व्हीडिओच्या माध्यमातून ही अवस्था आता समोर येऊ लागली आहे. एका व्हीडिओत छोट्या नाल्याच्या बाजुला उभे राहून लोक एकमेकांना आव्हान देत आहेत. त्यात एक माणूस दुसऱ्याला त्या नाल्यात ढकलतो आणि त्यानंतर आणखी एक माणूस तिसऱ्या माणसाला त्याच नाल्यात पाडतो. नाल्यात पडलेल्यांचे कपडे चिखलाने बरबटतात.

हे ही वाचा:

पंकजा ताई भाजप सोडून कुठेच जाणार नाहीत

कुर्ला गोळीबार प्रकरणात ४ सुपारीबाज अटकेत

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

गंगाविलास क्रूझ २५ नद्यांना जोडणार, अध्यात्म, भारतीय संस्कृतीचा होईल मिलाफ

दुसऱ्या एका व्हीडिओमध्ये तीन पाकिस्तानी नागरीक पीठाच्या एका पोत्यासाठी भांडताना दिसतात. एका माणसाच्या हातातील पीठाचे पोते हिसकावून घेण्यासाठी त्यांच्यात झटापट सुरू असते. अखेर ते पोते तो खेचून घेण्यात यशस्वी होतो.

पाकिस्तानात अभूतपूर्व अशी महागाई आणि तुटवड्याची स्थिती आहे. त्यातून धक्काबुक्की, हाणामारी, चेंगराचेंगरीचे अनेक प्रकार घडत आहेत. खैबर पख्तुनवा, सिंध आणि बलुचिस्तान येथे हे प्रकार पाहायला मिळत आहेत.

गव्हाच्या पीठाची किंमत १४० ते १६० किलो अशी झाली आहे. तर इस्लामाबादमध्ये १० किलोचे पोते हे १५०० रुपये या भावाने मिळते आहे. २० किलो पोत्यासाठी २८०० रु. मोजण्याची तयारी ठेवावी लागते आहे. सरकारला या किमती नियंत्रणात आणणे शक्य होत नाही. खैबर प्रांतात तर २० किलोसाठी ३१०० रुपये मोजावे लागत आहेत.

बँकांकडून परदेशी चलनाची ग्वाही दिली जात नसल्यामुळे बंदरांवर हजारो कंटेनर अडकून पडले आहेत.

Exit mobile version