भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता असून आता तेथील सरकारला आर्थिक संकटाचा सामनाही करावा लागत आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचेही पैसे बांगलादेशमध्ये अडकून पडले आहेत. याचं पार्श्वभूमीवर अदानी यांनी आता बांगलादेशच्या नव्या अंतरिम सरकारला इशारा दिला आहे. बांगलादेशने पैसे भरण्यास उशीर केल्यास बांगलादेशच्या वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
बांगलादेशातील अंतर्गत कलहामुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला होता. यानंतर बांगलादेशमध्ये नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली नवीन अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. नवे सरकार अदानी समूहाला विजेचे पैसे देण्यास विलंब करत आहे. अहवालानुसार, बांगलादेशला ५०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ४,२०० कोटी रुपये अदानी समूहाला द्यायचे आहेत. ही रक्कम सातत्याने वाढत आहे. इतकी मोठी थकबाकी असल्यामुळे अदानी समुहाने बांगलादेशला इशारा दिला आहे. अदानी समूह बांगलादेशला वीजपुरवठा करतो.
हे ही वाचा :
उत्तर प्रदेशात मशिदीवर रातोरात उभ्या राहिल्या तीन मिनार !
हरियाणामध्ये आप, काँग्रेसच्या युतीचे बिनसले; आपकडून उमेदवारांची यादी जाहीर
आरएसएसचे कार्य समजण्यासाठी राहुल गांधींना घ्यावे लागतील अनेक जन्म!
शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा !
अदानी पॉवरने बांगलादेशमधील अंतर्गत कलहानंतर आणि वाढत्या आर्थिक ताणतणावानंतरही वीजपुरवठा सुरू ठेवले आहे. कंपनीने सांगितले आहे की, आम्ही बांगलादेश सरकारशी सतत संवाद साधत आहोत आणि त्यांना या अस्थिर परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. दरम्यान, युनूस यांनी शेख हसीनाच्या कार्यकाळात करण्यात आलेले करार हे अत्यंत महागडे असल्याचे वर्णन केले आहे. यामध्ये अदानी समूहासोबतच्या वीज कराराचाही समावेश आहे. अदानी समूह आपल्या १६०० मेगावॅटच्या गोड्डा प्लांटमधून वीज पुरवठा करतो. ही वीज बांगलादेशलाही दिली जाते.