लोकसंगीताला अधिक उजळवणार पवनदीप

लोकसंगीताला अधिक उजळवणार पवनदीप

नुकताच इंडियन आयडलच्या १२ व्या सिझनचा महाअंतिम सोहळा पार पडला. इंडियन आयडलचा विजेता ठरलेला पवनदीप राजन याला अजूनही स्वतःच्या यशावर विश्वास बसत नाहीये. इंडियन आयडलचा किताब जिंकल्यावर पवनदीप याने नवभारत टाइम्सला मुलाखत दिली. विजेता म्हणून त्याचे नाव पुकारले जाईल, अशी कल्पनाच केली नसल्याचे पवनदीपने मुलाखतीत सांगितले. माझ्या सोबतचे सहाही जण उत्तम गायक आहेत, त्यामुळे मी माझ्या नावाची अपेक्षाच ठेवली नव्हती. माझ्या नावाचा पुकारा झाल्यावरही मला वाईट वाटले, कारण इथे असलेल्या सहाही जणांना किताब मिळायला हवा असे वाटत होते. इथे असलेले सहाही जण माझे खूप चांगले मित्र बनले आहेत. पण मला मिळालेला किताब म्हणजे लोकांच प्रेम आणि आशिर्वाद आहे, ज्याच्यामुळे मी इथपर्यंत आलो आहे अशा भावना पावनदीपने व्यक्त केल्या.

पवनदीपला पुढील वाटचालीबद्दल विचारले असता त्याने मुंबईत घर घेण्याची आणि एक स्टुडीओ तयार करण्याची इच्छा आहे, असे सांगितले. त्याला संगीत क्षेत्रातच काम करायचे असून उत्तराखंडातील लोकसंगीताला पुढे आणायचे आहे. जिंकलेल्या पैशातून चंपावतमध्ये एक संगीत प्रशिक्षणसंस्था बनवून तिकडच्या तरुणांमधील कौशल्याला प्रोत्साहन देणार आहे.

हे ही वाचा:

पालकच म्हणू लागले शाळा सुरू करा!

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ

रॉजर फेडररचा टेनिसमधून संन्यास? काय झाले आहे वाचा…

आमदार देवेंद्र भुयार यांना कारावासाची शिक्षा!

पवनदीपने इंडियन आयडल स्पर्धेपूर्वी २०१५ मध्ये ‘द वॉइस’ नावाचा एक रियालिटी शो केला होता आणि तिथेही किताब मिळवला होता. पुन्हा रियालिटी शोमध्ये भाग घेण्याचे कारण विचारले असता पवनदीपने सांगितले, की तेव्हा त्याचे वय कमी होते आणि आता मी खूप काही शिकलो आहे, खूप काही बदल झाले आहेत. आयुष्यातही अनेक चढ उतार पहिले आहेत म्हणून आता इंडियन आयडलमध्ये आलो आहे.

पवनदीपला त्याच्या आणि दुसरी स्पर्धक अरुणिता यांच्यामधील चर्चेबद्दल आणि टीआरपीसाठी असे केले जाते का असे विचारले असता पवनदीपने सांगितले, की नाही टीआरपीसाठी काही केले जात नाही. आम्ही बऱ्याचदा एकत्र गाण गायचो त्यामुळे अशा चर्चा होत होत्या. पण आम्ही खूप चांगले मित्र आहोत. बाकीचे स्पर्धकही खूप चांगले मित्र बनले आहेत आणि आमच्यातली ही मैत्री अशीच टिकून राहावी, अशी इच्छा आहे.

Exit mobile version