भारतात सध्या कर्नाटकमध्ये सुरू असलेला हिजाब वाद हा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजताना दिसत आहे. कारण तालिबान या दहशतवादी संघटनेपासून त्या मलालासारख्या काही प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांकडून या वादाला पाठिंबा दर्शवला जात आहे. यातच आता आणखीन एका प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाची भर पडली आहे. तो आहे फ्रान्सचा प्रसिद्ध फुटबॉलपटू पॉल पोगबा!
पॉल पोगबा याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडल वरून या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये बुरखा घातलेल्या मुली आणि भगवी शाल घेतलेली मुले यांच्यात शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. पण हा व्हिडिओ शेअर करताना त्यात असे लिहिले आहे की ‘हिंदुत्ववाद्यांची झुंड हिजाब घातलेल्या मुस्लिम मुलींना त्रास देताना’
हे ही वाचा:
‘काँग्रेसची हुजुरी करण्यासाठी संजय राऊत वाटेल ते बोलू शकतात’
पत्रकार राणा अय्यूब यांची १.७७ कोटी रक्कम ईडीने गोठवली
डॉक्टर घेणार हिप्पोक्रॅटिक ओथ ऐवजी चरक शपथ?
लता दीदींच्या स्मारकावरून राजकारण नको, मंगेशकर कुटुंबियांचे आवाहन
इस्लाम इज माय डीन या पेज वरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे जो पोगबाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये शेअर केला आहे. त्यामुळे कर्नाटक मधील हिजाब वादावर बोलणारा पोगबा हा दुसरा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध व्यक्ती ठरला आहे. पण पोगबाची ही भूमिका प्रामाणिकपणे घेतलेली आहे की एखाद्या टूलकिटचा हा भाग आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे हा सेल्फ गोल ठरणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
आधीच मलालाने या विषयात भाष्य केले होते मलालाने ट्विटरच्या माध्यमातून या विषयावर मत व्यक्त करताना भारतीय नेत्यांनी मुस्लिम मुलींना दुय्यम वागणूक देणे थांबवावे अशाप्रकारेचे मत व्यक्त केले होते. त्यामुळे मलालाला शिक्षणापेक्षा हिजाब अधिक महत्त्वाचा वाटतो का? असा सवाल विचारला जात होता