६७ प्रवाशांसह कझाकस्तानमध्ये लँडिंग करताना विमान कोसळले

अपघातग्रस्त विमान अझरबैजान एअरलाइन्सचे

६७ प्रवाशांसह कझाकस्तानमध्ये लँडिंग करताना विमान कोसळले

कझाकिस्तानमध्ये लँडिंगदरम्यान एका प्रवासी विमानाला भीषण अपघात झाला असून हे विमान कोसळले आहे. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कझाकिस्तानमधील अकाटू विमानतळावर हे विमान कोसळले आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या विमानात एकूण ६७ प्रवासी आणि पाच क्रू मेंबर्स होते, असे सांगण्यात येत आहे.

अझरबैजान एअरलाइन्सचे हे अपघातग्रस्त विमान अझरबैजानमधील बाकू येथून रशियातील चेचन्याला जात होते. रशियाची वृत्तसंस्था TASS ने वृत्त दिले आहे की, कझाकिस्तानमध्ये क्रॅश झालेल्या बाकूहून उड्डाण करणारे विमान धुक्यामुळे पहिले मखाचकला आणि नंतर अकताऊकडे वळवण्यात आले. कझाकिस्तानच्या आपत्कालीन सेवांचे म्हणणे आहे की विमान अपघातातील आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

१९९८ च्या ‘त्या’ घटनेमुळे अटलबिहारी वाजपेयीजींच्या नेतृत्वाचे दर्शन जगाला झाले!

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या १००व्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली!

‘आदित्य ठाकरेंचे वय आहे तेवढीही त्यांना अक्कल नाही’

मुख्यमंत्र्यांचा खोटा व्हीडिओ टाकणे पडणार महाग! १२ प्रोफाईल विरोधात गुन्हा दाखल

रशियन वृत्तसंस्थांनी सांगितले की, अझरबैजान एअरलाइन्सचे फ्लाइट J2- 8243 बाकूहून रशियातील ग्रोझनीकडे जात होते, परंतु ग्रोझनीमध्ये धुक्यामुळे ते पुन्हा मार्गस्थ करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विमान क्रॅश होण्याआधी आणि आगीच्या ज्वाळा येण्याआधी विमान अचानक खालच्या दिशेने येत असल्याचे दिसत आहे. तर, जमिनीवर विमान उतरताच विमानाला आग लागून घटनास्थळी धुराचे लोट उठताना दिसत आहेत. सध्या आपत्कालीन सेवांनी अपघातस्थळी आग विझवली असून कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले की, वाचलेल्यांना वैद्यकीय मदतीसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Exit mobile version