वैमानिक अत्यवस्थ झाल्यानंतर महिला प्रवाशाने उतरविले विमान

अपघाताची चौकशी राज्य पोलिस, राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ आणि केंद्रीय हवाई वाहतूकॅ प्रशासन करत आहेत.

वैमानिक अत्यवस्थ झाल्यानंतर महिला प्रवाशाने उतरविले विमान

अमेरिकेत एका लहान प्रवासी विमानाच्या वैमानिकाला वैद्यकीय आणीबाणीचा सामना करावा लागल्यानंतर त्यातल्याच एका प्रवाशाने विमानावर नियंत्रण मिळवून ते मॅसॅच्युसेट्स बेटावर सुरक्षितपणे उतरवले. ही घटना शनिवारी मार्था येथील विनयार्ड विमानतळाजवळ घडली. यात ७९ वर्षीय वैमानिक आणि एक महिला प्रवासी जखमी झाली.

मॅसॅच्युसेट्सच्या वेस्ट टिस्बरी येथील मार्थाच्या विनयार्ड विमानतळाजवळ शनिवारी दुपारी हा अपघात झाला. विमानाच्या अंतिम मार्गादरम्यान ७९ वर्षीय पुरुष वैमानिकाला आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला. मात्र ६८ वर्षीय महिला प्रवाशाने लगेचच कमान हाती धरली. मात्र धावपट्टीच्या बाहेर विमान उतरवावे लागल्याने विमानाचा डावा पंख अर्धा तुटल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. वैमानिक आणि जखमी प्रवासी अशा दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. वैमानिकाला गंभीर अवस्थेत बोस्टनच्या रुग्णालयात नेण्यात आले. महिला प्रवाशाला फारशी दुखापत झाली नसल्याने तिला स्थानिक रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

भारत इंडोनेशियात आता डिजिटल तंत्रज्ञान व्यवहार

नोव्हाक जोकोविचची मक्तेदारी संपुष्टात आणत कार्लोस अल्कराझ विम्बल्डन विजेता

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे एकाचा मृत्यू

गोरेगाव फिल्मसिटीत बिबट्याने केले कुत्र्याला ठार; कलाकार, कर्मचाऱ्यांत भीती

२००६ चे पायपर मेरिडियन हे विमान न्यूयॉर्क येथील वेस्टचेस्टर काउंटी येथून शनिवारी दुपारी निघाले होते. अपघाताची चौकशी राज्य पोलिस, राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ आणि केंद्रीय हवाई वाहतूकॅ प्रशासन करत आहेत. अपघातग्रस्त विमान हटवून विमानतळावरील सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले असून अपघाताची जागा स्वच्छ करण्यात आली आहे. सुमारे २४ वर्षांपूर्वी पायपर विमानात बसलेले जॉन एफ. केनेडी ज्युनियर, त्यांची पत्नी कॅरोलिन बेसेट आणि तिची बहीण लॉरेन बेसेट यांचा मार्थाच्या व्हाइनयार्डमध्ये अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version