26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरदेश दुनियामुंबई २६/११ हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा पक्ष पाकिस्तानच्या निवडणुकीत

मुंबई २६/११ हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा पक्ष पाकिस्तानच्या निवडणुकीत

दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तलहा सईद निवडणुकीच्या रिंगणात

Google News Follow

Related

२६/११ मधील मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याचा मुलगा तलहा सईद हा पाकिस्तानमधील निवडणुकीत उतरणार आहे. लाहोरच्या NA-127 जागेवरून निवडणूक लढवत असल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत हाफिज सईदच्या नवीन राजकीय संघटनेने आपले उमेदवारांनी निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.

हाफिजच्या पक्षाने संसदीय आणि राज्यांच्या विधानसभेच्या सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. हाफिजचा मुलगा तलहा हा नॅशनल असेंब्ली मतदारसंघ लाहोरमधून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, पीएमएमएलचे केंद्रीय अध्यक्ष खालिद मसूद सिंधू हा पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. हाफिज सईदच्या या पक्षाचे निवडणूक चिन्ह खुर्ची आहे.

PMML च्या प्रवक्त्याने पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ला सांगितले की, “त्यांच्या पक्षाने देशभरातील सर्व संसदीय जागा आणि प्रांतीय जागांसाठी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकही जागा सोडली नसल्याचा दावा ताबीश कय्युम यांनी केला. मात्र, इतर पक्षांनी आमच्याशी संपर्क साधल्यास आघाडी करत त्यांच्यासाठी काही जागांवरून उमेदवार मागे घेणार असल्याचे हाफिजच्या पक्षाने स्पष्ट केले आहे.”

हे ही वाचा:

सपा खासदार शफीकुर रेहमान याना बाबरी पुन्हा मिळवण्याची हौस!

राज ठाकरेंना निमंत्रण, उद्धव ठाकरे यादीत नाहीत!

सन २०२३मध्ये छोटे गुंतवणूकदार, छोट्या शेअर्सनी केली कमाल

नांदेडजवळ पूर्णा- परळी पॅसेंजर ट्रेनच्या डब्याला आग

हाफिज सईद हा मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आहे. हाफिज हा जमात-उद-दवा आणि लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेचा तो संस्थापक प्रमुख आहे. दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानच्या कोर्टाने त्याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष म्हणून सुटका केली. तर, भारतीय कोर्टाने झालेल्या खटल्यात त्याला दोषी ठरवण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा