पॅरिसमध्ये इस्लामी दहशतवाद्यांकडून पुन्हा हल्ला

पॅरिसमध्ये इस्लामी दहशतवाद्यांकडून पुन्हा हल्ला

फ्रान्स काल दुपारी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरून गेले. दहशतवाद्यांनी थेट पोलिस ठाण्यात घुसखोरी करून महिला पोलिस अधिकारीचा गळा चिरला. या हल्ल्यानंतर पोलिसांनी पॅरिसच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. दहशतवादविरोधी पथकाने घटनेचा कसून तपास सुरू केला असून काही वेळातच एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्याचे आणखी काही साथीदार हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय आहे. पोलिसांनी फरार असलेल्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे.

पॅरिसमध्ये मागील दोन वर्षांत पाच वेळा अशाप्रकारचे हल्ले झाले आहेत. सर्व हल्ल्यात निष्पाप नागरिकांच्या माना छाटण्याचा अतिरेक दहशतवाद्यांनी केला आहे. हल्ल्यांची मालिका सुरूच असल्याने फ्रान्सच्या सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. संभाव्य हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर सतर्कता बाळगूनही दहशतवादी घुसखोरी करीत आहेत. दोन वर्षात पोलिस अधिकाऱ्याला निशाणा बनवण्याची ही दुसरी वेळ आहे. फ्रान्सचे पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी हा हल्ला दहशतवादी हल्लाच असल्याचे म्हटले आहे.

फ्रान्समध्ये कट्टरपंथी इस्लामी तत्वांना लगाम घालण्यासाठी कठोर पावले उचलली गेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशात हल्ल्यांचे सत्र सुरू आहे. दहशतवाद्यांनी कितीही हल्ले केले तरी आम्ही मागे हटणार नाही. अशा प्रकारच्या घटनांमुळे आम्ही हार पत्करणार नाही. दहशत माजवणार्यांना जरब बसवण्यासाठी आणखी कठोर पावले उचलणार आहे, अशा शब्दांत पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी कट्टरपंथीयांना इशारा दिला आहे.

हे ही वाचा:

विरार दुर्घटनेत हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल

अनिल देशमुखांचे घर, कार्यालयासह, दहा ठिकाणी सीबीआयचे छापे

कोड्यात टाकणारा निर्णय…कलर कोड रद्द

सीबीआयने केला अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल

दहशतवादविरोधी प्रॉसीक्यूटर जीन फ्रेंकोइस यांनीही हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. ही अत्यंत निर्घृण घटना असल्याचे फ्रेंकोइस यांनी म्हटले आहे. हल्ल्यात सहभागी झालेले तसेच हल्ल्याचा कट रचणार्या सूञधारांना चांगलाच धडा शिकवला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. हल्लेखोरांनी महिला पोलिस अधिकाऱ्याची हत्या करण्यापूर्वी सरकारविरोधात नारे दिले होते.

Exit mobile version