पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परीक्षेबाबत विद्यार्थ्यांबरोबर होणारी चर्चा देशातच नव्हे तर जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. २७ जानेवारी रोजी होणाऱ्या चर्चेसाठी यावेळी जगातील १५५ देशांतील विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली आहे यावरुन याचा अंदाज करता येईल. मात्र, यातील बहुतांश भारतीय वंशाचे विद्यार्थी आहेत.गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुपटी पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी परीक्षेच्या चर्चेसाठी नोंदणी केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यावेळी ३८.८० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी पंतप्रधानांशी परीक्षेवर चर्चा करण्यासाठी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी केवळ पंधरा लाख लोकांनी नोंदणी केली होती.
हे ही वाचा:
दिल्लीतील कर्तव्यपथावरील संचलनात ‘नारीशक्ती’चं अद्भुत दर्शन
१०६ जणांना पद्म पुरस्कार.. जाणून घ्या कोण मानकरी
लव्ह जिहादचे नेमके चित्रण करणाऱ्या ‘आवरण’ कादंबरीचे लेखक भैरप्पांना पद्मभूषण
पंतप्रधान मोदींनी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली
ही चर्चा २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर होणार आहे. यामध्ये सुमारे अडीच हजार विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची प्रत्यक्ष उपस्थिती असेल, तर देशातील आणि जगातील इतर सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना या आभासी चर्चेने जोडण्याची तयारी सुरू आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यावेळी पंतप्रधान मोदींनी लिहिलेल्या एक्साम वॉरियर्स या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हे पुस्तक सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये तयार करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी बोर्डाच्या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करतील. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षेचा ताण आणि विद्यार्थ्यांच्या इतर समस्यांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देतील. या कार्यक्रमाचे पहिले पुष्प १६ फेब्रुवारी २०१८ रोजी गुंफल्या गेले होते.