24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामापाकिस्तानी मुलीला पालकांनीच दिली खुनाची धमकी...वाचा नेमके काय घडले

पाकिस्तानी मुलीला पालकांनीच दिली खुनाची धमकी…वाचा नेमके काय घडले

Google News Follow

Related

“त्या मुलाशी मैत्री तोड नाहीतर तुझा खून करू” अशी धमकी पालकांनीच आपल्या पोटच्या पोरीला दिल्याची घटना समोर आली आहे. इटली मधल्या एका पाकिस्तानी मुलीला ही धमकी मिळाली आहे. तिचा दोष इतकाच होता की तिने एका हिंदू मुलाशी मैत्री केली होती.

काही दिवसांपूर्वी म्हणजेच ८ तारखेला ही घटना प्रकाश झोतात आली. जेव्हा इटालियन पोलिसांनी या मुलीची तिच्या घरून सुटका केली. पाकिस्तानातून इटलीत जाऊन स्थायिक झालेले हे कुटूंब आहे. या घरातल्या मुलीची इटालीतल्या एका मुलाशी मैत्री झाली. त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. गेली जवळपास वर्षभर त्यांचे हे प्रेमप्रकरण सुरु होते. सगळे सुरळीत चालू होते, पण एक दिवस अचानक मुलीच्या घरच्यांना या नात्याची माहिती मिळाली आणि हा मुलगा हिंदू आल्याचे त्यांना समजले. हे कळताच त्यांचा राग अनावर झाला. त्यांचा हिंदू द्वेष इतका पराकोटीचा होता की त्यांनी आपल्या पोटच्या मुलीचाही कसलाच विचार केला नाही.

हे ही वाचा:

दलित भिकारी नाही, तर दलित शिकारी आहेत

तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत, आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?

बलात्काराचा आरोपी राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक

लॉकडाऊनची घोषणा आजच?

त्या मुलीला खोलीत डांबून ठेवले गेले. तिचा मोबाईल जप्त करण्यात आला. क्वचित प्रसंगी तिला बाहेर सोडले जायचे पण तिच्यासोबत कुटुंबातील कोणीतरी सोबत असल्याशिवाय नाही. त्या मुलीला धमकी देण्यात आली की तिला पुन्हा पाकिस्तानला पाठवले जाईल. प्रकरण इतके हाताबाहेर गेले की त्या मुलीला तिच्या घरच्यांनीच खुनाची धमकी दिली आणि सोबतच त्या मुलाचाही खून करायची धमकी दिली. “तू त्या हिंदू मुलाशी असलेले संबंध तोडले नाहीस तर तुझा आणि त्या मुलाचा खून करू” असे शब्द आपल्या घरच्यांकडूनच ऐकल्यावर ती मुलगी हादरली. तीला काय करावे सुचेना.

त्या मुलीला तिच्या ऑनलाईन क्लासेससाठी कॉम्पुटर वापरायची परवानगी होती. आपल्या घरच्यांच्या जाचाला कंटाळलेल्या आणि खुनाच्या धमकीनी घाबरलेल्या या मुलीने ईमेलचा वापर करून स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. त्यांना सर्व परिस्तिथी सांगितली. अखेर त्यांनी या मुलीची सुटका केली आहे तर तिच्या घरच्यांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरु झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा