हमासने इस्रायलविरुद्ध पुकारलेल्या युद्धात अनेकांचे जीव गेले आहेत. हमासच्या क्रूरतेच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. १० महिन्यांच्या जुळ्या मुलांना हमासच्या दहशतवाद्यांपासून वाचवण्यासाठी आई-वडिलांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिल्याचे समोर आले आहे.
इस्रायलचे ईताई बर्डीचेव्स्की आणि हदर बर्डीचेव्स्की हे त्यांच्या १० महिन्यांच्या जुळ्या मुलांसोबत होते. याच दरम्यान हमासचे दहशतवादी त्यांच्या घरात घुसले. त्यांनी घरात अंधाधुंद गोळीबार केला आणि घरातल्या सामानांची तोडफोड केली. त्यानंतर हे दहशतवादी घरातील निष्पाप मुलांच्या दिशेने निघाले. मात्र आईवडिलांनी त्यांना रोखले. दोघांमध्ये हाणामारी झाली. या दरम्यान दहशतवाद्यांना गुंतवून ठेवत त्यांनी त्यांच्या मुलांना लपवले. तीव्र संघर्षानंतर अखेर दहशतवाद्यांनी आई-वडिलांना गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर काही वेळातच इस्रालयचे सैनिक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलांना वाचवले. या जुळ्या मुलांना त्यांच्या आजी-आजोबांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
एक लाख इस्रायली सैनिकांचा गाझाला वेढा
नवरात्रौत्सव काळात रात्री १२ पर्यंत मेट्रो सेवा सुरु राहणार
भारत- पाक सामना बघायला जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन
नीरज चोप्राला ‘वर्ल्ड ऍथलिट ऑफ दी इअर’ पुरस्कारासाठी नामांकन
अशाच प्रकारे आणखीही एक घटना समोर आली आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यादरम्यान इस्रायलमध्ये राहणारे डेबोरा आणि श्लोमी माटियास आणि त्यांचा १६ वर्षांचा मुलगा रोटेम माटियास हल्ल्याच्या दरम्यान घरात लपले होते. या दरम्यान दहशतवादी घराचा दरवाजा तोडून आत घुसले होते. त्याने रोटेमवर बंदुक रोखली. मात्र मुलाचा जीव वाचवण्यासाठी डेबोरा आणि श्लोमी यांनी मुलांना लगेचच बाजूला सारले. त्यामुळे गोळी त्यांना लागली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यात रोटेम यालाही गोळी लागली असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.