मायक्रो- ब्लॉगिंग साइट ट्विटरच्या सीईओ पदी भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डॉर्सी यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पराग अग्रवाल यांच्या नियुक्तीसंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आली असून माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी पराग अग्रवाल यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले आहे.
पराग अग्रवाल हे आतापर्यंत ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) म्हणून काम पाहत होते. ट्विटरमध्ये ते संपूर्ण तांत्रिक जबाबदारी सांभाळत होते. पराग अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये इंजिनिअर म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. आता ते सीईओ पदाची धुरा संभाळणार असल्याचे डॉर्सी यांनी सांगितले.
हे ही वाचा:
‘महिला विरोधी आघाडी सरकारचं वस्त्रहरण’
न्यूझीलंडने चिवट झुंज देत पराभव टाळला
या वयात ही परिस्थिती पाहावी लागल्याने निराशेतून पवारांचे ‘ते’ विधान
शिवसेना आमदार रमेश कोरगावकर यांची ‘कोरिओग्राफी’
पराग अग्रवाल यांचे शिक्षण मुंबई आयआयटीमधून झालेले आहे. त्यांनी आयआयटी मुंबईमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. तसेच, त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडीही केली आहे. पराग अग्रवाल यांनी २०११ मध्ये ट्विटरमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. २०१७ मध्ये त्यांना कंपनीचे सीटीओ बनवण्यात आले. पराग यांना इंजिनियर एक्सपर्टीज आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आणि अॅड नेटवर्कमध्ये तज्ज्ञ मानले जाते.
ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ट्विटरवर जॅक डॉर्सी यांचे आभार मानले आहेत. जॅक आणि मी चांगले मित्र असून माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे मी जॅक यांचे आभार मानतो, असे पराग यांनी म्हटले आहे.